नवी दिल्ली : कृषी विधेयकाविरुद्ध निदर्शनं करण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर शेतकरी दिल्लीत दाखल झाले आहेत. पोलिसांनी शुक्रवारी (27 नोव्हेंबर) निदर्शकांना दिल्लीत येण्याची आणि बुराडी परिसरात शांततापूर्ण निदर्शनं करण्याची परवानगी दिली होती. हे सर्व आंदोलक शेतकरी कृषी विधेयकांचा विरोध करत आहेत. सरकारने आपल्या मागण्यांकडे लक्ष द्यावं, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
तीन दिवसांपूर्वी पंजाब आणि हरयाणातून मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले होते. या शेतकऱ्यांना पोलिसांनी दिल्लीच्या सीमेवरच रोखलं होतं. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी जागोजागी बॅरिकेडींग, नाकाबंदी केली. तसंच रस्त्यात अडथळे ठेवण्यात आले होते.
पण कोणत्याही परिस्थितीत दिल्लीत प्रवेश करणारच अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. यावरून काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी पोलिसांनी अश्रुधूराचा मारा केला. आंदोलकांवर पाण्याचा माराही करण्यात आला.
दरम्यान, यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज एक फोटो ट्विट करुन राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. फोटोत एक जवान शेतकऱ्यावर लाठीचार्ज करतानाचा हा फोटो अतिशय दुर्दैवी फोटो असल्याचं राहुल यांनी म्हटलंय. ”आपण आजवर जय जवान, जय किसान असा नारा ऐकत आलो आहोत. पण आज पंतप्रधान मोदींच्या अहंकाराने जवान आणि किसान एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. हे खूप धोकादायक आहे”, असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
बड़ी ही दुखद फ़ोटो है। हमारा नारा तो ‘जय जवान जय किसान’ का था लेकिन आज PM मोदी के अहंकार ने जवान को किसान के ख़िलाफ़ खड़ा कर दिया।
यह बहुत ख़तरनाक है। pic.twitter.com/1pArTEECsU
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 28, 2020
महत्वाच्या बातम्या
- ‘राष्ट्रवादी महाआघडीतून बाहेर पडणार नाही, भाजपने आता स्वत:च्या जीवावर सत्तेत येण्याची स्वप्ने बघावी’
- ‘माझ्यावर विष प्रयोग करणाऱ्या व्यक्ती बद्दल मला माहित होते’, लता दीदींचा धक्कादायक खुलासा
- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची लढत चुरशीची होणार !
- ‘अशोक चव्हाण आणि अजितदादांचे फ्यूज उडाले नाही तर आमचे सरकार 20 वर्ष टिकेल’
- ‘गृहमंत्र्यांनी देश चालवायला हवा, अमित शाह छोट्या-छोट्या निवडणुका मॅनेज करण्यात व्यस्त’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

