Share

कॉंग्रेसला मोठा धक्का; दिग्गज नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश

Published On: 

नाशिक- काँग्रेसला अलविदा केल्यानंतर येथील माजी आमदार आसिफ शेख यांनी आज अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.

पवारसाहेबांनी आपल्या राजकीय जीवनात अठरापगड जातींना घेऊन काम केले आणि करत आहेत.ही आपलेपणाची भावना राष्ट्रवादी काँग्रेस ठेवत आल्याने आज माजी आमदार आसिफ शेख यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी सांगितले.

कोरोनाची महामारी आल्यानंतर महामारीत काळजी घ्या असे आवाहन केले होते आणि मालेगावच्या लोकांना कोरोनातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. आसिफ शेख यांच्या काही अडचणी होत्या. त्यांनी आमच्याशी चर्चा केली. पिढ्यानपिढ्या काम करणाऱ्या लोकांची राष्ट्रवादीशी नाळ जोडलेली आहे. आसिफ शेख यांनी राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला आहे तो चांगला आहे. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आमच्याकडे प्रस्ताव दिला आहे असेही अजित पवार म्हणाले.

यावेळच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष पॅकेज देण्यात आले तसा असंघटित कामगारांनाही न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान डीपीडीसीमध्ये जास्तीचा निधी नाशिकला दिला जाईल असे आश्वासनही अजित पवार यांनी दिले शिवाय राष्ट्रवादी आजपासून तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!