लखनऊ: नेहमीच काही ना काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेते मंडळींची काही कमी नाही. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या याच वाक्त्यांमुळे विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या ची प्रकरणे नेहमीच समोर समोर येतात. यामध्ये आता भाजप खासदार साक्षी महाराज यांनी एक धक्कादायक आणि वादग्रस्त विधान केलं आहे. साक्षी महाराज यांनी काँग्रेसवर अत्यंत गंभीर आरोप लावला आहे.
काँग्रेसनेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणली होती, असा खळबळजनक आरोप साक्षी महाराज यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एका जनसभेला संबोधित करताना साक्षी महाराजांनी हा खळबळजनक आणि वादग्रस्त आरोप केला आहे. ‘काँग्रेसने सुभाषचंद्र बोस यांना मृत्यूच्या दाढेत पाठवलं होतं. माझा आरोप आहे की, काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या लोकप्रियतेपुढे पंडित नेहरू आणि महात्मा गांधीही फिके पडत होते. म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली’, असा आरोप साक्षी महाराज यांनी केला.
नुकतच नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे विक्टोरिया मेमोरियल मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे एकाच मंचावर आले होते. या दरम्यान साक्षी महाराजांच हे वादग्रस्त वक्तव्य केल. आहे.
महत्वाच्या बातम्या
- रेणू शर्मावर गुन्हा दाखल करा; चित्रा वाघ यांची मुंबई पोलिसांकडे मागणी
- ‘अकोल्याच्या मोर्णा नदीप्रमाणेच औरंगाबादच्या खाम नदीला मिळणार जीवनदान
-
उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती, तुमच्यासारखे भिकारी नाही; अब्दुल सत्तारांची भाजपवर टीका
- बायोमेट्रिक हजेरीमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले
- “भारतीय खेळाडूंसमोर तुम्ही प्राथमिक शाळेतले”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
