औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेने व्हेरॉक, भारतीय औद्योगिक महासंघ आणि इको सत्व यांच्या संयुक्त विद्यमाने तीन वर्षांच्या कालावधीत खाम नदीचे पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या पुढाकाराने खाम नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. औरंगाबाद शहर हे खाम नदीच्या काठावर वसलेले आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षात प्रदूषणामुळे नदीचे रुपांतर नाल्यात झालेय.
२०१८ मध्ये अकोला येथे जिल्हाधिकारी असताना पांडेय यांनी मोर्णा नदीची साफसफाई आणि पुनरूज्जीवन करण्यासाठी पुढाकार घेतला होता. सार्वजनिकरित्या राबविण्यात आलेली ही मोहिम यशस्वी झाले होते. त्यामुळे पांडेय यांचे संपूर्ण भारतात कौतुक झाले होते. देखभाल दुरूस्तीचा अभाव, कचरा टाकणे, नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी सांडपाणी सोडल्यामुळे अनेक वर्षांपासून खाम नदीची दुरावस्था झालेली आहे. आता खाम नदीचे पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्हेरॉक समुहाने सीएसआर फंडच्या माध्यमातून पुनरूज्जीवन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
नॉलेज पार्टनर असलेल्या इकोसत्वच्या संस्थापक नताशा जरीन यांनी सांगितले की, ‘इकोसत्वने ड्रोनच्या माध्यमातून खाम नदीचे सर्व्हेक्षण केलय. या सर्व्हेक्षणात २४९ ठिकाणी सांडपाणी शिरल्याचे दिसून आले. नदीकाठी १३ टक्के घनकचरा पसरलेला होता. यामुळे मनपाने भूमिगत गटार यंत्रणेत गळती लावण्याचा निर्णय घेतला आहे. झाडे लावून नाल्याचे पर्यावरणीय क्षेत्र सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाईल. मनपा अद्यावत यंत्राच्या माध्यमातून नदीतील घनकचरा बाहेर काढण्याचे काम करेल. पायाभूत विकासाऐवजी ग्रिनिंगवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- “तो भारतीय फलंदाजीचा एक मजबूत स्तंभ आहे”, पुजाराच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया
- ‘स्मशानभूमीच्या समस्या दूर करा’, निलेगाव ग्रामस्थ रस्त्यावर !
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणेचे भावनिक भाषण, व्हिडिओ व्हायरल
- ‘ममतांना ‘जय श्रीराम’ घोषणा देणे म्हणजे; वळूला लाल कपडा दाखवण्यासारखे’
- ‘ऑस्ट्रलिया दौऱ्याआधी माझ्याकडे पंतने व्यक्त केली होती इच्छा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
