🕒 1 min read
मुंबई:- सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं आहे. यासंदर्भात पोलिसांना त्यांनी लेखी लिहून दिलं आहे.
यासोबतच रेणू शर्मांच्या वकिलांनी देखील केस सोडल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही काळापासून तिची बहिण आणि मुंडे यांच्यात सलोख्याचे संबंध नव्हते. त्यामुळे ती मानसिक दबावाखाली होती, असं रेणू शर्माने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्यानंतर राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करत तक्रार केल्यानंतर ती पुन्हा परत घेतलेल्या रेणू शर्मा यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, धनंजय मुंडे यांच्यावर खोटा आरोप केल्या प्रकरणी रेणू शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन चित्रा वाघ यांनी रेणू शर्मा यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
हे प्रकरण धनंजय मुंडे किंवा रेणू शर्मा यांच्यापुरतं मर्यादित नाही. या प्रकरणात योग्य कारवाई झाली नाही तर त्याचे दूरगामी परिणाम राज्यातील लेकीबाळींना भोगावे लागतील. त्यासाठी तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी नांगरे-पाटील यांची भेट घेऊन केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- “तो भारतीय फलंदाजीचा एक मजबूत स्तंभ आहे”, पुजाराच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया
- ‘स्मशानभूमीच्या समस्या दूर करा’, निलेगाव ग्रामस्थ रस्त्यावर !
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणेचे भावनिक भाषण, व्हिडिओ व्हायरल
- ‘ममतांना ‘जय श्रीराम’ घोषणा देणे म्हणजे; वळूला लाल कपडा दाखवण्यासारखे’
- ‘ऑस्ट्रलिया दौऱ्याआधी माझ्याकडे पंतने व्यक्त केली होती इच्छा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
