🕒 1 min read
धुळे:- अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीसाठी अनेकजण आर्थिक मदत करत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाने राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. मंदिराच्या बांधकामासाठी अनेकजण मदतीचा हात करत आहेत. सूरतच्या एका व्यापाऱ्याने तर तब्बल 11 कोटी रुपये राम मंदिराच्या बांधकामासाठी दिले आहेत.
अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपकडून राज्यात राबवण्यात येत असलेल्या निधी संकलन मोहीमेवरून शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना लक्ष्य केले. भाजपचे नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत. इतरांसारखे भिकारी नाहीत, अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजपने दगा केला नसता तर आज राज्यात युतीची सत्ता असती. भाजप हा गरीबांचा नव्हे तर उद्योगपतींचा पक्ष आहे. राम मंदिराच्या नावाने निधी संकलन करणाऱ्या भाजपने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानायला हवेत, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “तो भारतीय फलंदाजीचा एक मजबूत स्तंभ आहे”, पुजाराच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया
- ‘स्मशानभूमीच्या समस्या दूर करा’, निलेगाव ग्रामस्थ रस्त्यावर !
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणेचे भावनिक भाषण, व्हिडिओ व्हायरल
- ‘ममतांना ‘जय श्रीराम’ घोषणा देणे म्हणजे; वळूला लाल कपडा दाखवण्यासारखे’
- ‘ऑस्ट्रलिया दौऱ्याआधी माझ्याकडे पंतने व्यक्त केली होती इच्छा’

