उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथील काही शेतकऱ्यांने दगड टाकुन स्मशानभूमीचा रस्ताबंद केल्याने निलेगाव येथील ग्रामस्थांनी 21 जानेवारी रोजी स्मशानभूमीचा रस्ता सुरळीत करावा या मागणीकरिता स्मशानभूमी समोर आंदोलन केले.
निलेगाव येथील गावालगतच असलेल्या जमिनीमध्ये विविध जाती धर्माची गेल्या अनेक वर्षा पासुन स्मशानभूमि आहे. 2004 साली जि.प उस्मानाबाद यांच्या मार्फत स्मशानभूमिचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु 2016 मध्ये सदरील बांधकाम पाडल्याच्या कारणावरुन तेथे आजतागायत वाद सुरु आहे. तेव्हा पासुन तेथील नागरीकांनी आपल्या न्याय हाक्कासाठी शासन दरबारी अनेक वेळा सर्वच मार्गाने आंदोलन करुण देखील संबंधीत प्रशासना कडुन आजपर्यंत कोणताच न्याय मिळाला नाही.
तर आता तेथील काही शेतकऱ्याने स्मशानभूमिकडे जाणार्या रस्त्यावरच मोठ मोठे दगड टाकुन रस्ता बंद केल्या मुळे अंत्यविधी कोठे करायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या अनुषंगाने निलेगाव येथे तेथील ग्रामस्थांनी बिरोबा मंदिरापासून शांततेत मूक मोर्चा काढून स्मशानभूमी समोर ठिय्या आंदोलन केले व जोपर्यंत रस्त्यावरील दगड काढत नाही तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी बसणार असा पवित्रा तेथील नागरिकांनी घेतला आहे.
तसेच ‘तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन आम्हाला न्याय द्यावा’. अशी मागणी केली. परिस्थिती चिघळत असल्याचे दिसताच पोलिसांनी लोकांना प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन थांबवले.
महत्वाच्या बातम्या
- ऑस्ट्रेलियामधील ऐतिहासिक विजयावर आनंद महिंद्रा खूश; या खेळाडूंना मिळणार SUV
- प्रकृती आणखी ढासळल्याने लालूंना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवले…
- जयंत पाटील सलग १८ दिवस दौऱ्यावर; ३ हजार किलोमीटरचा प्रवास करत घेणार आढावा
- अजूनही हार्दिक दुःखातून सावरला नाही; वडिलांच्या आठवणीत झाला भावूक
- वनडे, टी-२० संघात पंतला ‘या’ फलंदाजाच्या जागी संधी मिळाली पाहिजे


