🕒 1 min read
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड दिल्यानंतर टीम इंडिया इंग्लडविरुद्ध भिडण्यासाठी सज्ज आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात येणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही सामन्यांचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे.
तामिळनाडू क्रिकेट बोर्डाने हे 2 सामने प्रेक्षकांविनाच खेळवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे क्रिकेट चाहत्यांना या 2 कसोटी सामन्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामन्याचा आनंट लुटता येणार नाही. या मालिकेतील पहिला सामना 5-9 फेब्रुवारी, तर दुसरा सामना 13-17 फेब्रुवारीला खेळण्यात येणार आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा त्यांच्या घरच्या मैदानावर सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिकेत पराभूत केल्यानंतर यजमानांवर अनेक माजी खेळाडू टीका करत आहेत. आता या टीकेत आणखी एक भर पडली आहे. भारतीय संघाचे माजी कोच आणि ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ग्रेग चॅपल यांनी ऑस्ट्रेलियाच्या आणि भारताच्या युवा खेळाडूंची तुलना केली. ऑस्ट्रेलिया संघातील युवा खेळाडू हे भारतीय संघाच्या युवा खेळाडूच्या तुलनेत अद्याप प्राथमीक शाळेतले वाटतात अशा शब्दात चॅपल यांनी डोस दिलाय.
स्टार खेळाडू नसताना आणि दुखापतीग्रस्त असलेल्या भारतीय संघाने मालिका २-१ अशा अविश्वसनीय विजय मिळवला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंवर घेतलेल्या मेहनतीमुळे हे शक्य झाल्याचे ते म्हणाले.आमचे युवा खेळाडू हे भारतीय युवा खेळाडूंसमोर काहीच नव्हते. त्यांना भारातीय खेळाडूंकडून १६ वर्षाखालील सामन्यांमध्ये आव्हान मिळते, असे चॅपल यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना सांगितले.
ऑस्ट्रेलियाचे युवा खेळाडू अद्याप ज्युनिअर संघातून खेळत असताना त्याच वेळी भारतीय युवा खेळाडू मात्र राष्ट्रीय संघात स्थान मिळवतात आणि संघाला यश मिळून देत आहेत.मला हे सांगताना वाईट वाटते पण विल पुलोवस्की आणि कॅमरून ग्रीन हे अद्याप प्राथमिक शाळेत आहेत, असे चॅपल म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- “तो भारतीय फलंदाजीचा एक मजबूत स्तंभ आहे”, पुजाराच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया
- ‘स्मशानभूमीच्या समस्या दूर करा’, निलेगाव ग्रामस्थ रस्त्यावर !
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणेचे भावनिक भाषण, व्हिडिओ व्हायरल
- ‘ममतांना ‘जय श्रीराम’ घोषणा देणे म्हणजे; वळूला लाल कपडा दाखवण्यासारखे’
- ‘ऑस्ट्रलिया दौऱ्याआधी माझ्याकडे पंतने व्यक्त केली होती इच्छा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
