औरंगाबाद : काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य जनतेसाठी, त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी सदैव तत्पर आहे. शहराच्या विविध समस्या प्रश्न त्यासंबंधी काँग्रेस पक्ष नेहमीच आवाज उठवत असतो. आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सामान्य जनतेचे जे काही प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवे. असे आवाहन औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. बुढीलेन, मिलकॉर्नर व रशीदपुरा वाॅर्डातून मोठया संखेने युवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यवसायिक लोकानी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. याप्रसंगी ते बोलत होते.
लवकरच औरंगाबादेत महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. काँग्रेसही यात आता मागे नाही. येत्या निवडणुकीत काँग्रेसचाच तिरंगा फडकायला हवा यासाठी कॉंग्रेसकडून जोरदार तयारी सुरू आहे. नुकतेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दौऱ्यानंतर शहर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून वरचेवर पक्षात प्रवेश होताना दिसून येत आहेत.
गुरुवारी लोक विकास परिषदेचे मेडिकल सेल व मध्य शहर अध्यक्ष मोहम्मद मोइनुद्दीन जमिलोद्दीन, शेख आसिफ शेख ख्वाजा, शहर उपाध्यक्ष लोक विकास परिषद व मोहम्मद शफीक मोहम्मद साबिर लोक विकास परिषद यांनी सुद्धा या कार्यक्रमाप्रसंगी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. याप्रसंगी सर्वांना काँग्रेस पक्षाचे मफलर टाकून अधिकृतपणे प्रवेश देण्यात आला. या सर्व प्रवेश घेतलेल्या लोकांना भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसला म्हणणारे पाटील आता म्हणाले, ‘युतीचा विचारही होऊ शकतो’
- ‘मोदी सरकार रोजगारासाठी हानीकारक’ ; राहुल गांधींचा हल्लाबोल
- आम आदमी पार्टी पुणे महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार!
- बीडमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेत पुन्हा जुंपली; आमदार पुतण्यावर काका क्षीरसागरांचे गंभीर आरोप
- शुटिंगच्या वेळी घोड्याचा मृत्यू; दिग्दर्शक मणिरत्नम यांच्याविरोधात तक्रार दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

