Share

आम आदमी पार्टी पुणे महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार!

Published On: 

पुणे – आम आदमी पार्टीच्या राज्य समितीने पुण्यात पत्रकार परिषदेत पुण्यातील कॅन्टोन्मेंट सह मनपा च्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा केली. गेले काही दिवस आप राज्यसमिती विविध शहरांना भेटी देत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. शहरी तोंडावळा असूनही आम्हाला ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला असून आता पुण्यासारख्या शहरात चांगला प्रतिसाद जनतेकडून मिळेल. पुण्यात महसूल विभागापाठोपाठ महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी च्या आशीर्वादाने टक्केवारी आणि भ्रष्टाचारबाबत नवा टप्पा गाठला आहे. आणि या ‘भाजप राष्ट्रवादी भाऊ भाऊ,सर्व वाटून खाऊ’ या धोरणाचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे आता आप ची ही निवडणूक पुणेकर जनताच लढवेल’ असा विश्वास आपचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी व्यक्त केला.

पुण्याच्या बजेट मधील निधी मूलभूत सुविधा ऐवजी सुशोभीकरणा वर खर्च होतो आहे. दिल्लीत केवळ वचननामा दिला नाही तर सर्व आश्वासन पूर्तता केली. तोच विश्वास आम्ही पुणेकरांना देऊ इच्छितो. निधीचा अपव्यय टाळला तरी मोठे उद्दिष्टे साध्य होऊ शकतात. पुणेकरांच्या समस्या आधारित जाहीरनामा तयार केला जाईल असे आपचे राज्य संघटक विजय कुंभार यांनी सांगितले.

आप हा स्वच्छ प्रतिमेचा पक्ष आहे. महाराष्ट्रातील आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. अश्या स्थितीत आप सारखा राजकीय पर्यायच ही परिस्थिती सुधारू शकतो असे आपचे सह संयोजक किशोर मंध्यान यांनी सांगितले. दिल्लीतील विकास कामे आणि प्रस्थापित राजकीय पक्षांकडून होत असलेली जनतेची फसवणूक यामुळे आप हा पर्याय जनता स्वीकारेल असे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत पुणे शहर अध्यक्ष मुकुंद किर्दत संघटन मंत्री डॉ अभिजित मोरे, सह संयोजक संदीप सोनावणे संदेश दिवेकर, विद्यानंद नायक आदी उपस्थित होते. संध्याकाळी एस एम जोशी फौंडेशन सभागृह येथे कार्यकर्ता मेळावा झाला. त्यात राज्य समिती अध्यक्ष , उपाध्यक्ष , संघटक , सचिव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश झाले. माजी पुणे मनपा उपआयुक्त अनिल गायकवाड यांनीही या वेळेस पक्ष प्रवेश केला.

जायका , स्मार्ट सिटी ,अमिनिटी स्पेस, वाहतूक प्रश्न , रस्ते , शिक्षण , आरोग्य सुविधा आणि महिला सुरक्षा या मुद्द्यांवर भाजप अपयशी ठरले आहे. पुण्यातील राजकीय परिस्थिती व भाजपा – राष्ट्रवादी यांचे संगनमत या मुळे कॉंग्रेस – भाजपा ला मतदान करणारा मतदार यावेळेस आप कडे वळेल अशी शक्यता आप चे शहर अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केली. येणाऱ्या निवडणुकीबाबत प्रचार मोहिमेतील प्रमुख टप्पे व नियोजन याबबत सहसंयोजक संदीप सोनावणे यांनी मांडणी केली तर संघटना वाढीसंदर्भात संघटन मंत्री अभिजित मोरे आणि आर्थिक नियोजनाबाबत खजिनदार श्रीकांत आचार्य यांनी मांडणी केली. संदेश दिवेकर यांनी इतर सामाजिक संघटना ,गट यांच्यासोबतच्या चर्चेची माहिती मांडली. सचिव विद्यानंद नायक यांनी सूत्र संचालन केले.आनंद अंकुश यांनी रिक्षा चालकांचे प्रश्न मांडले. आप ला रिक्षा चालक, घरेलू कामगार महिला, पालक यांचे मोठे मतदान होऊ शकते अशी परिस्थिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!