Share

‘मोदी सरकार रोजगारासाठी हानीकारक’ ; राहुल गांधींचा हल्लाबोल

Published On: 

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित करून मोदी सरकारवर हल्लबोल केला होता. तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचा थेट झळ देशातील सर्वसामान्य नागरिकाला बसते. जनतेच्या खिशावर याचा परिणाम होतो. प्रवास खर्च वाढल्यानं महागाई वाढते, पण याचा मोदी सरकारला काहीच फरक पडत नाही, असं राहुल गांधी म्हणाले होते.

तर आता राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं असून यात मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘मोदी सरकार रोजगारासाठी हानीकारक आहे. कोणत्याही प्रकारच्या ‘मित्रहीन’ व्यवसायांना किंवा रोजगारा प्रोत्साहन किंवा मदत मोदी सरकार करत नाही. ज्यांच्याकडे नोकरी आहे तीही हिसकावून घेण्याचं काम केलं जात आहे. देशवासियांकडून आत्मनिर्भरतेचं ढोंग त्यांना अपेक्षित आहे. जनहितार्थ जारी,’ असं ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

तसेच यापूर्वी बोलताना राहुल गांधी बोलताना म्हणाले होते कि, ‘भाजपा सरकार प्रत्येकाला लुटण्यात व्यस्त आहे. पण आता संपूर्ण देश या लुटीच्या विरोधात एकत्र येत आहे. GDP त वाढ म्हणजे Gas, Diesel, Petrol च्या किमतीत वाढ आहे’, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. ‘डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत मात्र भरमसाठ वाढ करून मोदी सरकारनं तब्बल २३ लाख कोटी रुपये जनतेच्या खिशातून गोळा केले आहेत, ते गेले कुठे’ असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!