मुंबई : सौंदर्यवती व लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या आगामी चित्रपटाचे निर्देशक मणिरत्नम यांच्यावर नुकतीच तक्रार दाखल करण्यात आली. गेल्या काही महिन्यापासून मणिरत्न दिग्दशिर्त ‘पान्नीयिन सेलवन’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटातून ऐश्चर्या राय बच्चनच्या अभिनयाची जादू लवकरच पहायला मिळणार आहे.
हा चित्रपट युध्दावर आधारित असल्याने घोडयांचा समावेश आहे, मात्र शुटींग दरम्यान एका घोडयाचा दुघटनेत मृत्यू झाला. या घटनेनंतर ‘पीईटीए’ ने मणिरत्नमच्या प्रॉडक्शन हाऊस तसेच घोडयाच्या मालका विरोधात प्राथमिक स्वरूपाची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पशु कल्याण बोर्ड ने दिग्दशक मणिरत्नम यांची चौकशी देखील केली होती.
हा चित्रपट पाचशे करोडच्या आसपास बजेटचा असून पहिला पोस्टर नुकताच लाँच झाला आहे. चित्रपटात ऐश्चर्या राय बच्चनसह अलावा चियान विक्रम, तृषा कृष्णन, जयम रवी आदींसह कलाकारांचा समावेश आहे. ही घटना हैद्राबादमध्ये सुरू असलेल्या शुटींग दरम्यान घटल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. सध्या चित्रपटाचे शुटींग ओरछा, मध्यप्रदेशात सुरू असून,
मणिरत्नम निर्देशित या चित्रपटास एआर रहेमान यांचे संगीत असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सायरा बानू यांचा एंजिओग्राफीस करण्यास नकार\
- ‘काका संजय गांधींनी माझ्या वडिलांचे ऐकले असते तर ‘तो’ अपघात झाला नसता’, राहुल गांधींचा खुलासा
- चार वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ प्रकरणामुळे रकुल प्रीतची आज ईडीकडून चौकशी
- ‘…तर संजय राऊतांचा अमेरिकेचाही अभ्यास असू शकतो’; चंद्रकांतदादांचा राऊतांना चिमटा
- पुणेकरांच्या पैशांवर डल्ला मारण्याचेच काम भाजपकडून सुरू आहे – राष्ट्रवादी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

