अकोला : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून राज्यात सत्ता स्थापन केल्यापासून सर्वाधिक आमदार असून देखील ऐनवेळी शिवसेनेशी युती तुटल्यामुळे विरोधी पक्षात बसावं लागलेल्या भाजपने हल्लाबोल केला आहे. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही असा दावा करण्यासोबतच मंत्र्यांनी घोटाळा केल्याचे आरोप भाजपकडून सातत्याने केले जात आहेत. तर, शिवसेनेनं साथ सोडल्याची सल देखील भाजपच्या नेत्यांनी अनेकवेळा जाहीरपणे बोलून दाखवली आहे.
दरम्यान, शिवसेना आणि भाजपमधील कमालीचा संघर्ष वाढला असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये बोलताना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जहरी टीका केली होती. ‘पाठीत खंजीर खुपसणारे असं म्हटलं केलं की आधी एकाच नेत्याचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. मात्र आता पाठीत खंजीर खुपसणारे म्हटल्यावर आणखी एक दुसरा चेहरा नजरेसमोर येतो,’ असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. याच वाक्याचा त्यांनी आज अकोल्यात देखील पुनरुच्चार केला आहे.
शिवसेनेनं आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय. त्यामुळे तुर्तास तरी शिवसेनेबरोबर युती शक्य नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. ते अकोल्यात बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी शिवसेनेसोबतचा युतीबाबत देखील सूचक विधान केलं आहे. ‘वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात अशक्य असं काहीही नाही. भविष्यात शिवसेनेसोबत सौहार्दाचे संबंध प्रस्थापित झाल्यास युतीचा विचारही होऊ शकतो,’ चंद्रकांत पाटलांच्या या विधानामुळे आता राजकीय क्षेत्रात विविध तर्क लावले जात आहेत. यासोबतच त्यांनी, 2014 मध्ये युती तुटूनही मंत्रिमंडळाचे गठन युतीच्या माध्यमातूनच झाल्याची आठवण देखील यावेळी सांगितली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझी आई सांगत होती, एकवेळ कुत्रा पाळ पण धोकेबाज आणि घाणेरडी माणसं पाळू नकोस’
- ‘काका संजय गांधींनी माझ्या वडिलांचे ऐकले असते तर ‘तो’ अपघात झाला नसता’, राहुल गांधींचा खुलासा
- चार वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ प्रकरणामुळे रकुल प्रीतची आज ईडीकडून चौकशी
- ‘…तर संजय राऊतांचा अमेरिकेचाही अभ्यास असू शकतो’; चंद्रकांतदादांचा राऊतांना चिमटा
- पुणेकरांच्या पैशांवर डल्ला मारण्याचेच काम भाजपकडून सुरू आहे – राष्ट्रवादी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
