Share

२०२४ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस सरकार येईल- नाना पटोले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole ) यांनी एक मोठा दावा केला आहे. सन २०२४ साली नरेंद्र मोदी यांच्या पराभवानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्या नेतृत्वात काँग्रेस सरकार सत्तेवर येईल. असा दावा त्यांनी ट्वीट करत केला आहे. अलीकडेच देशात पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. यापैकी चार राज्यात भाजपने वर्चस्व गाठले आहे. त्यातच नाना पटोले यांचा दावा नव्या चर्चांना वाट करून गेला आहे.

दरम्यान नाना पटोले यांनी इंधन दरवाढीवरून केंद्रावरही निशाणा साधला आहे.आज पुन्हा पेट्रोल ३० पैसे, तर डिझेल ३५ पैशांनी वाढले. गेल्या ७ दिवसात इंधनाचे दर ४ रूपयांनी वाढले. निवडणूक असती तर मोदी सरकारने अशी दरवाढ होऊ दिली नसती. भाजपला केवळ सत्ता हवी आहे. जनतेशी देणेघेणे नाही.असे पटोले यांनी म्हटले आहे.

तसेच ‘गरज सरो, वैद्य मरो’ वृत्तीचे केंद्रातील भाजप सरकार निवडणुका संपताच महागाई भडकवते. या संवेदनहीन आणि निर्लज्ज सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष ३१ मार्चपासून ७ दिवस महागाईच्या विरोधात आंदोलन छेडणार असल्याचेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

मधमाशी पालन व्यावसायिकांना कृषी विज्ञान केंद्रांमधून मदतीचा हात!

मविआ सरकारमधील तीन मंत्र्यांचा आज कोकणात ‘पॉलिटिकल शो’

“जाधवांनी पोच पावती, बिलं ही घेतले असेल?”, ‘त्या’ कारवाईवरून किरीट सोमय्यांची टीका

“आज देशात जे चित्र दिसत आहे, ते जर असंच राहिलं तर…”, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

“सुसंस्कृत आणि सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी…”, अजित पवारांचे मोठे वक्तव्य

.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!