मुंबई : गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि राजकारण्यांचा देखील समावेश आहे.
मात्र, देशाबाहेरील कलाकारांनी या आंदोलनावर भाष्य केल्यानंतर भारतातील सेलिब्रिटींच्या एका गटाने देशातील एकता जपणं महत्वाचं असल्याचं म्हणत बाहेरच्या सेलिब्रिटींनी यात नाक खुपसू नये अशी समज दिली होती. इंटरनॅशनल पॉप स्टार रिहाना, पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांच्यासह माजी अडल्ट स्टार मिया खलिफा हिनं देखील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं होतं.
हे प्रकरण सद्या जगभरात गाजत आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केलेल्या सेलिब्रिटींच्या ट्विटचा आशय सारखाच आहे. हा आशय सारखा असल्याने त्यांना कोणी हे करायला सांगितले का ? असा सवाल सामान्यांमध्ये उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या दबावाखाली सेलिब्रिटींनी ट्वीट केलं का? याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटायला लागले आहेत. यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे’, असे ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.
या तपासणीवरून भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतंय. यामुळे सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. ‘भारतरत्नाने सन्मानित केलेल्या व्यक्ती आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय आहेत.पण त्यांच्यावर कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दबाव टाकला का? त्या नेत्याची चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे’, असे ट्वीट करून अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटीं तपासणी प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.
भारतरत्नाने सन्मानित केलेल्या व्यक्ती आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय आहेत.पण त्यांच्यावर कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दबाव टाकला का? त्या नेत्याची चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. https://t.co/9c6Ns4DuHT
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 8, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘अजितदादा, चिंधी विचार सोडून महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला’
- ‘पेग्वीन’ सेनेनं पूर्णपणे शरणागती पत्करलीय
- पवार ना कधी क्रिकेट खेळले ना कुस्तीत उतरले, तरीही ते समित्यांचे अध्यक्ष होते; सदाभाऊंचा टोला
- ‘२०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस हा राज्यात क्रमांक एकचा पक्ष होईल
- देशात काय मोगलाईचं राज्य आहे का ? अजित पवार संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

