Share

‘अजितदादा, चिंधी विचार सोडून महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला’

Published On: 

रत्नागिरी : शेतकरी आंदोलनाला तब्बल ७५ दिवस उलटून देखील शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यातील वादावर कोंडी फुटलेली नाही. याच वरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. ते सद्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना देशात मोगलाई आहे का ? असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारवर प्रहार केला आहे.

‘शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना त्यांच्या वाटेत खिळे ठोकले जातात. शेतकऱ्यांना यापूर्वी कधीही अशाप्रकारची वागणूक मिळाली नव्हती. आता या देशात मोगलाई आली आहे का ? असा संतप्त सवाल अजित पवारांनी केला आहे. ‘एकूणच केंद्र सरकार शेतकरीविरोधी भूमिका का घेत आहे, हे कळायला मार्ग नाही. पण शेतकऱ्यांची अशी अडवणूक खपवून घेणार नाही,’ असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

अजित पवार यांच्या या टीकेला भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘अजित पवारांना महाराष्ट्र सरकार म्हणायचं होत चुकून देशात म्हणाले… हेराफेरी करून पद मिळाल्यावर असं होतं. परवा भाषणात कुठेतरी ‘मी अनेक वेळा आमदार झालो पण जॅकेट घातलं नाही’ म्हणाले, ह्याला चिंधी विचार म्हणतात साहेब तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला.’ असा सणसणीत टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!