Share

“काँग्रेसचा एक उमेदवार मागे घेण्यात यावा अन्यथा..” ; गिरीश महाजनांचा सल्ला

Published On: 

जळगाव :  येणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही आम्ही भाजपचा पाचवा उमेदवार निवडून आणणार आहोत, त्यामुळे कॉंग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे घ्यावा, असा सल्ला भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर आज ते जळगाव आले आहेत. या निवडणुकीत भाजपचे तिसरे उमेदवार धनजंय महाडिक यांना निवडून आणण्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमदार महाजन यांची महत्त्वपूर्ण होती. दरम्यान आता होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. येत्या २० जून रोजी विधान परिेषदेच्या १० जागांसाठी मतदान होत आहे. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

यावेळी महाजन म्हणाले, विधानपरिषदेत पाचवा उमेदवार निवडून आणण्याचे आम्ही नियोजन केले आहे. आमच्या पाचही उमेदवारांना लागणाऱ्या मतांचा कोटा आम्ही मिळवण्याची सगळी तयारी केली आहे. त्यामुळे आमचा उमेदवार हा निवडूण येणारच याची आजच खात्री देतो. काँग्रेसने आपला एक उमेदवार मागे घेऊन आमचा पाचवा उमेदवार विजयी करून ही निवडणूक बिनविरोध करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

पुढे ते म्हणाले की, या निवडणुकीत भाजपच्या चार जागा निश्‍चित असल्या तरी, दोन अतिरिक्त उमेवार उभे केले आहेत. मात्र, एका उमेदवाराची माघार घेऊन पाचव्या जागेसाठी पक्ष मैदानात उतरणार आहे. शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रसेचे दोन उमेदवारांचा विजय निश्‍चित असले तरी कॉंग्रेसचा दुसरा उमेदवारासाठी अतिरिक्त मतांची गरज आहे. भाजपला पाचव्या उमेदवारासाठी थेट २७ मतांची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!