Share

वीजबिलात धनदांडग्यांना सवलती, शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली-प्रवीण दरेकर

Published On: 

लातूर : महाविकास आघाडी सरकार श्रीमंत, कारखानदारांना वीज वापरासाठी सवलत देत आहे. परंतु सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना मात्र वसुलीसाठी सक्ती केली जात आहे. वीज बिलांबाबत सरकारने शेतकऱ्यांचा छळ सुरू केला आहे. तो थांबला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर वीज बिलावरून टीका केली. वीज बिल आणि विविध प्रश्नांसंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांना मागण्यांचे निवेदन दिले.

ते म्हणाले, बोगस बियाणे, दुबार पेरणी आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी त्रस्त आहेत. सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. त्यासोबतच वीज मंडळाने सक्तीची वसुली सुरू केली असून जोडण्या तोडल्या जात आहेत. शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी टप्पे पाडून द्यावेत. मूळ बिलावर आकारण्यात आलेले व्याज आणि दंड माफ करून मूळ बिलात ५० टक्के सवलत द्यावी.

लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने ३०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. परंतु ऊर्जामंत्र्यांनी केलेली ही घोषणा केराच्या टोपलीत गेली आहे. गरिबांची पिळवणूक करणारे हे सरकार असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!