Share

शिवजयंतीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम पूर्ण करा; अन्यथा आत्मदहनाचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहरातील ऐहिसिक घडामोडींचा साक्षीदार असलेल्या क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय महापालिकेने शिवप्रेमींच्या मागणीनंतर घेतला. मात्र, त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. पालिकेने दोन वर्षापूर्वी येथील जुना पुतळा काढला. त्यानंतर चबुतरा बांधण्याचे काम हाती घेतले. मात्र पैसे वेळेवर मिळत नसल्याने कंत्राटदाराने काही काळ काम थांबवले होते. येणाऱ्या १९ फेब्रुवारी २०२२ च्या आत या पुतळ्याचे काम पुर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा क्रांती मोर्चा तर्फे देण्यात आला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम संथ गतीने सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून शिवजयंती शिवरायांच्या पुतळ्याविना साजरा करण्यात आल्या आहेत. मात्र येणाऱ्या शिवजयंतीला तरी पुतळ्याचे काम पूर्ण झालेले असावे अशी अपेक्षा शिवप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे. सध्या क्रांती चौकातील चबुतर्‍याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारुढ पूर्णाकृती एकवीस फूट उंच व बावीस फूट लांब आणि सहा टन वजनाचा पुतळा पुण्यात तयार होत आहे. चित्रकल्पक आर्ट स्टुडिओचे दीपक थोपटे व त्यांचे सहकारी हा पुतळा बनवत आहे.

पुतळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच डिसेंबर किंवा जानेवारी २०२२ मध्ये क्रांती चौकात हा पुतळा बसविला जाईल. असे मनपातर्फे सांगण्यात आले आहे. १९ फेब्रुवारी २०२२ च्या शिवजयंती पूर्वी पुतळ्याचे काम पूर्ण झाले नाही तर क्रांती चौकात आत्मदहनाचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे गणेश उगले यांनी दिला आहे. याठिकाणी काही बरे वाईट घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मनपा प्रशासनाची असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. या निवेदनावर गणेश उगले, प्रदीप नवले, अमोल साळुंके यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!