मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. मलिकांनी वानखेडेंचा जन्माचा दाखल ट्विट केला करत ‘समीर दाऊद वानखेडे’ इथून हा फर्जीवाडा सुरू झाल्याचा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर आत समीर वानखेडे यांच्या परीवाराचे जात प्रमाणपत्र समोर आले आहे. त्यामुळे मलिकांनी केले हे आरोप खोटे आहेत का? यावर सर्वांच्या नजर आहेत.

समीर यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांचे यांचा शाळा सोडल्याचा दाखल समोर आला असून अकोल्यातील न्यू इरा हायस्कूलमध्ये ते शिकत होते. तसेच त्यांच्या जात प्रमाणपत्रावर देखील अनुसूचित जातीचा उल्लेख केला आहे. समीर हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वरुडतोफा गावचे रहिवासी असल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, काल(२५ ऑक्टो.)मालिकांनी समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला ट्विट करत समीर हे मुस्लीम असल्याचे म्हटले होते. ते मशिदीमध्ये जाऊन भाषण करतात. तसेच ते जन्माने मुस्लीम असून त्यांनी एका अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची जागा बळकावली आहे. त्यांनी खोट्या जात प्रमाणपत्रावर यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून महसूल विभागात नोकरी मिळविली आहे, असेही मलिक म्हंटले.
महत्वाच्या बातम्या
- ‘सोशल मीडियावर खेळ खेळत बसण्यापेक्षा पुरावे द्या’; क्रांतीचे मलिकांना प्रत्युत्तर
- ‘गृहमंत्री काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय आणि भारताचा पराभव साजरा’ संजय राऊतांचे टीकास्त्र
- नवाब मलिक लवकरच रिलीज करणार ‘स्पेशल २६’
- ‘सुभाष साबणे यांना निवडून देऊन ताळ्यावर नसलेल्या राज्य सरकारला शॉक देण्याची संधी गमावू नका’
- ‘ट्विटर कोर्ट आहे का?’; क्रांती रेडकरने मलिकांना सुनावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
