🕒 1 min read
मुंबई : एक आई म्हणून किती संघर्ष करावा लागला हे सांगतांना बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी आणि निर्माती ताहिरा कश्यप हिने तिच्या एका पुस्तकात सांगीतले. तिने सांगीतलेला किस्सा ऐकून अनेकांनी तिला चांगलच सुनावले.
ताहिरा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. एकदा ताहिरा तिच्या मुलाला एका रेस्टॉरंटमध्ये विसरली होती. हा खुलासा ताहिराने ‘द 7 सिन्स ऑफ बींग ए मदर’ या पुस्तकाच्या लॉन्चच्या वेळी केला आहे. ताहिराची दोन मुलं असून विराजवीर आणि वरुष्का असे नाव आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ताहिरा विराजवीरला रेस्टॉरंटमध्ये विसरल्याचे तिने सांगितले आहे. मी माझ्या मुलाला एका रेस्टॉरंटमध्ये विसरले होते. तेव्हा एक वेटर धावत आला आणि म्हणाला मॅडम तुम्ही तुमच्या मुलाला विसरलात. मला खूप लाज वाटली आणि लोक माझ्याकडे बघत होते.’
https://www.instagram.com/p/CVZrhC0I11G/?utm_medium=copy_link
तसेच ताहिराने तिच्या पुस्तकात हा किस्सा देखील सांगितला आहे. , ‘दुपारी मी माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींसोबत जेवायला बाहेर गेली होती. त्यानंतर मी त्यांना मिठी मारली आणि लिफ्टच्या दिशेने आम्ही लिफ्टच्या दिशेने निघालो. तेवढ्यात स्टाफमधला एक सदस्य माझ्यादिशेने धावत आला आणि लिफ्टबंद होऊनये म्हणून त्याने दारात पाय ठेवला. ‘मॅडम, तुम्ही तुमच्या मुलाला विसरलात!’ लिफ्टमधले असलेल्या सगळ्यांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला, ते मी कधीच विसरू शकणार नाही. लोक बिल भरणे विसरतात किंवा बॅग विसरतात. मी माझ्या बाळाला विसरले होते याची खंत ही व्यक्त केली. तिच्या या पुस्तकाद्वारे बऱ्याच गोष्टींचा खुलासा ही केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सोशल मीडियावर खेळ खेळत बसण्यापेक्षा पुरावे द्या’; क्रांतीचे मलिकांना प्रत्युत्तर
- ‘गृहमंत्री काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय आणि भारताचा पराभव साजरा’ संजय राऊतांचे टीकास्त्र
- नवाब मलिक लवकरच रिलीज करणार ‘स्पेशल २६’
- ‘या’ वकिलाच्या माध्यमातून समीर वानखेडेंनी बॉलिवूडमधून खंडणी वसूल केली’; मलिकांचा गौप्यस्फोट
- वानखेडे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्याची ॲड कनिष्क जयंत यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
