🕒 1 min read
नाशिक : बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधत असताना बँक खातेदाराची माहिती घेत ऑनलाइन सव्वा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार त्र्यंबकेश्वर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस दलाच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान, तिवारी यांचे बंधू एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृतीशी झुंज सुरू असतानाच तिवारींची फसवणूक झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
रुपेश तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी (दि. २३) एचडीएफसी बँकेचा कस्टमर केअर नंबरचा गुगलवर शोध घेतला. याठिकाणी बँकेचा बनावट कस्टमर केअर नंबर मिळाला. या नंबरवर फोन करत ‘बँकने २४७३ रुपये माझ्याकडून जास्त घेतले गेले’ असे तिवारींनी सांगितले. यावर संशयिताने रक्कम परत करतो असे सांगत अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले व आयडी विचारला.
तिवारींनी आयडी देताच त्यांचा मोबाइल हॅक करत ४९ हजार रुपये दोनदा व २१ हजार ५५५ असे सुमारे सव्वा लाख रुपये ऑनलाइन काढून घेत फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्यांना आहे तिथेच ठेवा, इथे आले तर…’, फडणवीसांचे टीकास्त्र
- जगाला सध्या धार्मिक, आर्थिक व राजकीय दहशतवादापासून धोका-रामदेव बाबा
- ‘देख लो यारो, गधे घोडे दौडा रहे है…’; भातखळकरांचा मलिकांना टोला
- ईडी म्हणजे पानतंबाखुचे दुकान, माझ्या घरीही धाड पडू शकते-आ. प्रणिती शिंदे
- ‘मोदी सरकारने पीक विम्याचा हप्ता रोखला’, सचिन सावंत यांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
