🕒 1 min read
मुंबई : क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान आणि त्याच्यासह इतर अनेक जणांना २ ऑक्टोबर अटक करण्यात आले. त्यानंतर सध्या काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. यावरून समीर वानखेडेंची पत्नी मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेत वानखेडेंवरील आरोपांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
क्रुझ ड्रग्स प्रकरण आणि आर्यन खान प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचे गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर समीर वानखेडे यांनी बॉलिवूडला बदनाम करण्याचा घाट घातल्याचा आरोपही केला जातो आहे.
समीर वानखेडे फक्त कलाकारांना पकडत नाहीत. ते फक्त दोन-तीन टक्के आहेत. इतर अनेक गँगस्टर, ड्रग्स पेडलरलाही त्यांनी पकडलं आहे. ते कोणत्या पक्षासाठी काम करत नाहीत, ते न्यूट्रल आहेत, असं मत क्रांती रेडकर यांनी व्यक्त केलंय. त्याचबरोबर समीर वानखेडे यांना आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. लटकवू, जाळून टाकू, मारुन टाकू, अशा शब्दात आम्हाला धमक्या येत असल्याचा गंभीर आरोपही क्रांती रेडकर यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हा न्यायालयांना लोकल रिट्स काढण्याचे अधिकार देण्याची मागणी
- ‘त्यांना आहे तिथेच ठेवा, इथे आले तर…’, फडणवीसांचे टीकास्त्र
- जगाला सध्या धार्मिक, आर्थिक व राजकीय दहशतवादापासून धोका-रामदेव बाबा
- ‘देख लो यारो, गधे घोडे दौडा रहे है…’; भातखळकरांचा मलिकांना टोला
- ईडी म्हणजे पानतंबाखुचे दुकान, माझ्या घरीही धाड पडू शकते-आ. प्रणिती शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
