🕒 1 min read
बीड : नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे ३० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तर ३० किलोमीटरचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर रेल्वे सुरू करण्यासाठी तातडीने चाचणी घ्यावी. उर्वरित बीड ते परळी रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली.
केंद्रीय मंत्री दानवे यांची औरंगाबाद येथे माजी मंत्री क्षीरसागर यांनी भेट घेतली. मुंबई ते नागपूर हा समृद्धी मार्ग सुरू होत आहे. या मार्गाच्या समांतर मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. देशात नवीन बुलेट ट्रेनसाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. त्या नवीन मार्गात या मार्गाचा समावेश करण्यात यावा.
या रेल्वे मार्गामुळे मराठवाडा व विदर्भाचे दळणवळण सुधारेल आणि औरंगाबाद व नागपूर या शहरातील व्यापार व उद्योग वाढीसाठी मोठा फायदा होऊ शकेल. या नवीन रेल्वे मार्गाची योग्यता तपासून सर्वेक्षण करण्यात यावे, अशी विनंती माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थावर ईडीची धाड
- ‘मोदी-शहांकडून देशाची विक्री; अंबानी, अदानींकडून खरेदी’, बाळासाहेब थोरातांचा घणाघात
- ‘गेल्या चार-पाच वर्षांपासून आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरू’, राष्ट्रवादीचा आरोप
- ‘बिरोबाच्या खोट्या शपथा घेतल्या तर त्याचं पार वाटोळं होतं’, जयंत पाटलांचा पडळकरांना टोला
- ‘योग्य वेळी सीडी लावणार, सध्या ती पोलिसांकडे’, खडसेंचा इशारा


