🕒 1 min read
नागपूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले होते. राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेची टक्केवारी सोमय्या यांनी डिबेटमध्ये जाहीर केली. राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेपैकी ४० टक्के रक्कम शिवसेनेला मिळते.४० टक्के रक्कम राष्ट्रवादीला मिळते, तर २० टक्के रक्कम काँग्रेसला मिळते, असा आरोप केला होता.
यावर सोमय्या हे खोटे बोलतात, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सोमय्यांवर टीका केली. वरील आरोप करत असताना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नव्हते. सार्वजनिकरित्या असे खोटे आरोप करणं काँग्रेस खपवून घेणार नाही, अशी तंबी त्यांनी दिली. सोमय्या नेहमीच खोटे आरोप करत असतात. त्यांनी केलेले खोटे आरोप रेक्रार्ड केले असून, याची तक्रार नागपूर पोलीस आयुक्तांकडे केल्याची माहिती लोंढे यांनी दिली.
राज्य सरकारवर केलेल्या आरोपाचे किरीट सोमय्या यांनी पुरावे द्यावे अन्यथा माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. सोमय्यांविरोधात एक रुपयाचा मानहानीचा दावा नागपूरच्या न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेची सोमय्या यांना माफी मागावी लागणार असल्याचेही लोंढे यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अखेर मुख्यमंत्री ठाकरेंनी मान्य केले की ते घरकोंबडे आहेत’
- अजित पवार बनवाबनवी आणि फसवाफसवी थांबवा- किरीट सोमय्या
- मलिक पुन्हा करणार एक गौप्यस्फोट, ‘मिलते है रविवार को’ म्हणत दिला इशारा!
- राज ‘का’ कारण! सहानुभूतीची लाट आणि एकजुटीमुळेच देगलूरमध्ये काँग्रेसचा विजय
- राजकारणात २५-३० वर्षांपूर्वी आम्हीही नको ती अंडी उबवली; मुख्यमंत्र्यांचा जुन्या युतीवरून भाजपला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
