Share

प्रदर्शनापूर्वीच ’83’ चित्रपट अडकला वादाच्या भोवऱ्यात; जाणून घ्या कारण

Published On: 

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगचा ’83’ या चित्रपटाने याआधीच बरीच चर्चा निर्माण केली आहे. चित्रपटाचा ट्रेलर असो किंवा गाणी, चाहत्यांना या सर्व गोष्टी आवडत आहेत आणि प्रत्येकजण चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान ’83’ चित्रपटावर दुबईमधील एक व्यक्तीने कट रचून फसवणुक केल्याचा आरोप केला आहे. मुंबईतील प्रथम न्यायदंडाधिकारी कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीमध्ये ’83’ चित्रपटाचे सर्व निर्माते आणि दीपिका पदुकोण या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक असल्याने अभिनेत्रीलाही या वादग्रस्त प्रकरणात ओढण्यात आले आहे. कलम ४०५, ४०६, ४१५, ४१८, ४२० आणि १२० ब अंतर्गत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये दीपिका शिवाय साजिद नाडियाडवाला आणि कबीर खान यांचे देखील नाव आहे. तक्रार करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की हैदराबादमध्ये चित्रपटाशी संबंधीत काही बोलणे झाले होते. तसेच विब्री मीडियाशी चित्रपटाच्या इनवेस्टमेंट विषयी देखील बोलणे झाले होते. जवळपास १६ कोटी रुपये यामध्ये त्या व्यक्तीने गुंतवले होते. मात्र निर्मात्यांनी त्या व्यक्तीला कोणतीही माहिती न देता या सर्वातून काढल्यामुळे तक्रार केली आहे.

तक्रार करणाऱ्या व्यक्तीच्या वकीलांनी माहिती दिली आहे. ‘हे सत्य आहे की फसवणूक आणि कट रचल्या प्रकरणी ’83’ चित्रपटाच्या निर्मांत्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. आम्ही सुरुवातीला आपापसात हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. पण चित्रपटाच्या निर्मात्यांना आमचे म्हणणे ऐकण्यात रस नसल्याचे मला कळाले. त्यामुळे आम्ही कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादूकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!