Share

अपघातात ठार झालेल्या दोघांच्या नातेवाईकांना ४८ लाखाची भरपाई द्या

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील दोघे जण मृत झाले तर आठ वर्षांचा नातू गंभीररीत्या जखमी झाला. एकाच कुटुंबातील या तिन पिढ्यांसाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय के. कुलकर्णी यांनी जवळपास ४८ लाखांच्यावर भरपाई देण्याचे आदेश इन्शुरन्स कंपनी, ट्रकचालक, आणि ट्रकमालक यांना दिले आहेत.

पैठणहून औरंगाबादला येणा-या निलजगाव येथील रहिवासी आजोबा रामभाऊ विनायक कुसेकर (वय ६०), वडील नंदकिशोर रामभाऊ कुसेकर (वय २९), नातू चैतन्य नंदकिशोर कुसेकर या तिघांना २४ मार्च २०१४ रोजी भरधव ट्रकने उडवले होते. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रामभाऊ कुसेकर, नंदकिशोर कुसेकर या दोघांचा उपचारादरम्यान घाटी रूग्णालयात मृत्यू झाला होता. तर चैतन्य कुसेकर हे गंभीर जखमी झाले होते. या अपघात प्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात ट्रकचालक शेख उमर शेख गुलाम (रा.आसेफिया कॉलनी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी कुसेकर यांच्या नातेवाईकांनी वकील अण्णासाहेब मुळे (शेकटेकर) यांच्यावतीने मोटार अपघात न्यायाधिकरणात दावा दाखल केला.

अपघातामधील मयत नंदकिशोर कुसेकर हे दत्तकृपा सेवा केंद्राचे मालक असून, ते आयकर दाते होते. चालकानेही आपल्या चुकीने अपघात झाल्याचे न्यायालयात कबुल केले. खटल्यात सीएची साक्षही महत्वपूर्ण ठरली. न्यायालयाने युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी, चालक शेख उमर व मालक शेख उस्मान शेख महेबूब यांना संयुक्तरित्या अथवा वैयक्तीक स्वरूपात नंदकिशोर कुसेकरला ४० लाख २५ हजार आठशे रूपये भरपाईचे आदेश दिले. आजोबा रामभाऊंच्या वारसांना ४ लाख २५ हजार आठशे तर जखमी चैतन्यला ३ लाख ७१ हजार ७९८ रूपये देण्याचे आदेशित केले. संबंधित रक्कमेवर दावा दाखल केल्यापासून वार्षिक आठ टक्के व्याज देण्याचेही आदेश दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!