मुंबई : ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया मायदेशी परतलेली आहे. मात्र, भारतात परतल्यानंतर मुलाखतीत युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत म्हणाला, लोक माझी महेंद्रसिंग धोनीसोबत तुलना करत असल्याचा आनंद आहे.
पंतची कायमच भारताचा महान यष्टीरक्षक-फलंदाज आणि माजी कर्णधार धोनीशी तुलना केली जाते. धोनीने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, त्याआधीच भारतीय संघ धोनीला वगळून पंतला संधी देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पंतला या संधीचे सोने करण्यात वारंवार अपयश आले होते. परंतु, नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने अप्रतिम खेळ केला. त्याने या कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा (२७४) केल्या. त्यामुळे पुन्हा त्याची धोनीसोबत तुलना होत आहे.
पुढे पंत म्हणाला, लोक माझी धोनीसोबत तुलना करतात आणि या गोष्टीचा मला आनंद आहे. परंतु, माझी तुलना इतर खेळाडूंशी झाली नाही, तर मला जास्त आवडेल. भारतीय क्रिकेटमध्ये मला माझे स्वतःचे नाव कमवायचे आहे. मला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. महान खेळाडू आणि युवा खेळाडू यांच्यात तुलना करणे मला फारसे पटत नाही, असे पंतने सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीच्या पाठिंब्यामुळे चांगली कामगिरी करू शकलो : मोहम्मद सिराज
- “पंचांनी आम्हाला मैदान सोडण्याचाही पर्याय दिला होता, पण…”, वर्णद्वेषावर सिराजचा खुलासा
- कसोटी संघाचे नेतृत्व रहाणे करणार ?
- ‘उद्या, मला वाटेल मुख्यमंत्री व्हावं कोणी करणार का ?’
- रेणू शर्मांकडून तक्रार मागे; शरद पवार म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

