Share

कसोटी संघाचे नेतृत्व रहाणे करणार ?

Published On: 

मुंबई :  ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया मायदेशी परतलेली आहे.

रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताला दमदार विजय मिळाल्यामुळे आता अजिंक्‍यकडेच कसोटी सामन्यांचे कर्णधारपद सोपवावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. हुशार नेतृत्व व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची रहाणेची वृत्ती निवड समितीतील सदस्यांनाही भावली असल्यानेच निदान कसोटी संघाचे कर्णधारपद त्याला सोपवावे असाही विचार अनेक सदस्यांनी मांडलेला आहे.

दरम्यान, विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाले. इंग्लंड विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत कोहली पुन्हा मैदानावर दिसेल. संघाचा तो नियमित कर्णधार असल्याने हे होणारच होते. मला नेतृत्वाची संधी दिली जाईल असे वृत्त माझ्याही कानावर आले आहे. मात्र, त्यात कोणतेही तथ्य नाही. कोहली पालकत्व रजेवर होता त्यामुळे तो संघात परतल्यावर तोच नेतृत्व करणार हे उघड होते. त्यामुळे सध्यातरी या विषयावर बोलण्यात रस नाही, असे मत रहाणेने व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!