मुंबई : राजकारणात महत्त्वकांक्षा बाळगणे अत्यंत महत्वाचे असते असे म्हटले जाते कारण तुम्ही अपेक्षा सोडल्यास तुम्ही बाजूला सरले जाता. त्यामुळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वाना पद प्राप्त करण्याची मनीषा असते. अशीच एक इच्छा दोन दिवसांपूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलून दाखवली होती.
‘आमच्या पक्षाकडे अजून मुख्यमंत्रीपद आलेलं नाही. माझी इच्छा असणारच. प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावंस वाटणारचं. पण, पक्ष म्हणजे शरद पवार हे जो निर्णय घेतील, तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इच्छा आहे. मला वाटतं सगळ्यानांच असेल. एवढा दीर्घकाळ काम करणाऱ्याला, माझ्या मतदारांनाही असू शकते. त्यामुळे माझी जबाबदारी माझे मतदार आहेत. इच्छा आहे, पण परिस्थिती, संख्या… आमची ५४ आहे. ५४ आमदार असताना मुख्यमंत्री होणं शक्य नाही. त्यासाठी पक्ष वाढला पाहिजे. संख्या वाढली पाहिजे. संख्या वाढली… पक्ष मोठा झाला, तर शरद पवार हे जो निर्णय घेतील तो मान्य असेल.’ असे पाटील म्हणाले होते.
त्यावर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, ‘उद्या, मला वाटेल मुख्यमंत्री व्हावं कोणी करणार का ?’ अशी मिस्कील प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी यावेळी पाटील यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
‘गेली 20 वर्ष राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे, पाटील यांनी म्हटलं होत.’ जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. या विधानाने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यावर राजकीय वर्तुळातून खोचक आणि चांगल्या प्रतिक्रिया देखील आल्या
महत्वाच्या बातम्या
- ग्रामसेवक संजय शिंदे आत्महत्येप्रकरणी गटविकास अधिकारी, कर्मचाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल
- सॅल्यूट! बेघर बालकांना पाहून जागी झाली पोलिसांतील माणुसकी, चिमुकल्यांना मिळाला आसरा
- ‘सरकार गोट्या खेळतय का ? वेळकाढूपणा खपवून घेणार नाही’
- रेणू शर्मांकडून तक्रार मागे; शरद पवार म्हणाले…
- धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा; गंभीर आरोप करणाऱ्या रेणू शर्मांकडून तक्रार मागे


