Share

विराट कोहलीच्या पाठिंब्यामुळे चांगली कामगिरी करू शकलो : मोहम्मद सिराज

Published On: 

मुंबई : ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया मायदेशी परतलेली आहे. मात्र, भारतात परतल्यानंतर मुलाखतीत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज म्हणाला, विराट कोहलीने दिलेल्या पाठिंब्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि मी कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करू शकलो.

आयपीएल स्पर्धेत सिराज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळतो. कोहली या संघाचा कर्णधार असून त्याने सिराजवर नेहमी विश्वास दाखवला आहे. याचा फायदा त्याला कसोटी क्रिकेटमध्ये झाला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना तीन सामन्यांत १३ विकेट घेतल्या. भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो अव्वल स्थानावर होता. ब्रिस्बन येथे झालेल्या अखेरच्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने ५ विकेट घेतल्या. कसोटीच्या एका डावात पाच विकेट घेण्याची ही सिराजची पहिली वेळ ठरली.
विराटने नेहमीच पाठिंबा दिला

आरसीबी आणि विराटने माझ्यावर नेहमीच विश्वास दाखवला आहे. २०१८ आयपीएल मोसमात मी फारच निराशाजनक खेळ केला होता. परंतु, त्यांनी पुढील मोसमासाठी मला संघात कायम ठेवले. विराटने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करू शकतो असा त्याला विश्वास होता. त्याच्या पाठिंब्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला, असे सिराज म्हणाला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!