मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. स्वत: फेसबुक पोस्ट करुन धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या बहिणीशी सहसंबंधाचा खुलास केला होता. मात्र, पैशांच्या कारणास्तव मला करुणा यांच्या बहिण रेणू यांच्याकडून ब्लॅकमेल केलं जातंय, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी रेणू यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
रेणू शर्मा यांच्या आरोपानुसार जर तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती. मागील पंधरा दिवसांत मुंडे आरोपांनी घायाळ झाले होते. मात्र आता संबंधित तरुणीने तक्रार मागे घेतल्याने त्यांना या प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे.
त्यावरच पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय निष्कर्षाला येऊ नये, असं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं, त्यानुसार आमचा निर्णय योग्य, महिलेने तक्रार मागे घेतल्याचं कळतंय, रेणू शर्माने धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतली, त्याविषयी फारशी माहिती नाही, कागदपत्रं जेव्हा आमच्या हातात आली, तेव्हा खोलात जाण्याची गरज आहे, असा आम्ही निष्कर्ष काढला, तो बरोबर होता असं म्हणायला लागेल.
महत्वाच्या बातम्या
- ग्रामसेवक संजय शिंदे आत्महत्येप्रकरणी गटविकास अधिकारी, कर्मचाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल
- सॅल्यूट! बेघर बालकांना पाहून जागी झाली पोलिसांतील माणुसकी, चिमुकल्यांना मिळाला आसरा
- ‘सरकार गोट्या खेळतय का ? वेळकाढूपणा खपवून घेणार नाही’
- …तर राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही; वीजबिलावरून दरेकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा
- धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा; गंभीर आरोप करणाऱ्या रेणू शर्मांकडून तक्रार मागे


