Share

“पंचांनी आम्हाला मैदान सोडण्याचाही पर्याय दिला होता, पण…”, वर्णद्वेषावर सिराजचा खुलासा 

Published On: 

ऑस्ट्रेलिया : ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया मायदेशी परतलेली आहे. मात्र, भारतात परतल्यानंतर एका मुलाखतीत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सिडनीत अनुभवाव्या लागलेल्या वर्णद्वेषी शेरेबाजीबद्दल खुलासा केला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान तिसरा कसोटी सामना सिडनीत खेळवला गेला होता. या सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी भारतीय खेळाडूंना वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला होता. तिसऱ्या दिवसाच्या प्रकारानंतर भारताने आयसीसीकडे औपचारिक तक्रार देखील नोंदवली होती. मात्र चौथ्या दिवशी सीमारेषेवर उभ्या असलेल्या सिराजबाबत तोच प्रकार पुन्हा झाल्याने भारतीय संघाने सामना थांबवून पंचांकडे तक्रार केली होती. त्यांनतर पंचानी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने या प्रेक्षकांना मैदानाबाहेर हाकलले होते.

याच प्रकाराबाबत सिराजने भारतात परतल्यावर सविस्तर भाष्य केले आहे. तो म्हणाला, “ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मी तत्काळ आमचा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या कानावर घातली. त्याने पंचांकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर पंचांनी आम्हाला मैदान सोडून जाण्याचा पर्याय दिला होता, मात्र रहाणेने तो स्विकारला नाही. आम्ही खेळाचा आदर करतो, त्यामुळे आम्ही मैदान सोडून जाणार नाही पण त्या प्रेक्षकांना बाहेर काढा, असा पवित्र रहाणेने घेतला. त्यामुळे त्या प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढण्यात आले.”

या प्रकरणाचा स्वत:वर काय परिणाम झाला यावर बोलताना सिराज म्हणाला, “ते प्रेक्षक वर्णद्वेषी शेरेबाजी करत होते. मात्र त्यामुळे मानसिकरित्या अजूनच कणखर झालो. मी त्याकडे दमदार कामगिरी करण्याची अजून एक संधी म्हणून पाहिले. आम्ही याबाबत तक्रार दाखल केली असून त्याची चौकशी चालू आहे. यातून योग्य न्याय मिळेल, अशीच आमची अपेक्षा आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!