मुंबई: मी पंतप्रधानांसारखा नापास झालो नाही. माझं मार्कशीट पाहू शकता. काँग्रेस पक्ष असा पक्ष आहे जो पूर्ण भारतीयतेला सोबत घेऊन चालतो. ज्यांना देश वाचवायचा आहे त्यांनी काँग्रेसमध्ये यावं आणि ज्यांना देश विकायचा आहे त्यांनी भाजपमध्ये जावं. देशातील एक व्यक्ती रात्री येऊन टीव्हीवर काही बोलत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुमचं भलं होणार आहे, अशी खोचक टीका कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar)यांनी भाजपवर केली आहे. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी निशाना साधत कन्हैया कुमार यांना टोला लगावला आहे.
ज्या भारतीय कम्युनिस्ट पक्षातून कन्हैया कुमार कॉंग्रेसमध्ये आला आहे त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सगळ्या नेत्यांना काँग्रेस पक्षाच्या असलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीमध्ये १९ महिने तुरुंगात डांबले होते. अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत केली आहे.
ज्या भारतीय कम्युनिस्ट पक्षातून कन्हैया कुमार कॉंग्रेसमध्ये आला आहे त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सगळ्या नेत्यांना काँग्रेस पक्षाच्या असलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी १९ महिने तुरुंगात डांबले होते. pic.twitter.com/I7zh2Yh1c4
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 10, 2021
दरम्यान सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाच्या समारोपानिमित्त पुणे काँग्रेसच्या वतीने कन्हैया कुमार यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचीही उपस्थिती होती. यावेळी त्यांनी भाजपवर निशाना साधत टीका केली.
महत्वाच्या बातम्या
- तुमचे खासदार सुद्धा आमच्या जीवावरच निवडून आलेत; शंभुराज देसाईंचा चंद्रकांत पाटलांना टोला
- जंगलपहाडातला योद्धा शेवटी जंगलातच कोसळला- संजय राऊत
- मानवी हक्कांचा आदर करणे आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक आहे- नवाब मलिक
- ‘विराटला टी-२० कर्णधारपद न सोडण्याची केली होती विनंती, पण…; सौरव गांगुलीचा खुलासा
- ‘अर्थ स्पष्ट आहे यांना ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही, केंद्राच्या नावाने हात पाय…’


