मुंबई : निवडणूक आयोगानं २० नोव्हेंबर २०२०च्या आदेशान्वये एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम सुरू केला होता. या कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार १ डिसेंबर २०२० रोजी सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी १४ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आली.
सदर निवडणुका पार पाडताना कोरोनाच्या अनुषंगाने घ्यावयाच्या खबरदारीबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. नामनिर्देशनपत्रे स्वीकार करण्यास सुरुवात झाली आहे. ३० डिसेंबरपर्यंत द्यावी लागणार.निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे भरतांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.
अशातच, सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीपासून ते उमेदवारी अर्ज भरेपर्यंतच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ सुरु असल्याचं दिसतंय. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर वारंवार बदलत असणाऱ्या निर्णयांमुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यातच नव्या जीआरमुळे गोंधळ आणि वाद वाढण्याची चिन्हं आहेत. या नव्या जीआरनुसार सदस्यांपासून ते सरपंचपदापर्यंत किमान सातवी पास ही अट ठेवण्यात आली आहे.
काय आहेत उमेदवाराच्या पात्रतेचे निकष?
जो उमेदवार १९९५ नंतर जन्मलेला असेल, आणि ज्याला सदस्य किंवा सरपंच म्हणून नियुक्त करायचे असेल तर संबंधित उमेदवार सातवी पास असणे आवश्यक आहे. २४ डिसेंबरला हा जीआर जारी करण्यात आला आहे.
यातच, निवडणूक आयोगाने इच्छुकांना २३ ते ३० डिसेंबर २०२० दरम्यान अर्ज भरण्यास सांगितले आहे. २५,२६,२७ सलग सुट्ट्या आल्याने २८,२९,३० असे तीनच दिवस आता हातात शिल्लक आहे. त्यातच, कागदपत्रांची जुळवाजुळव, जातपडताळणी प्रमाणपत्र यासह इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेच आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यातील शेतकरी संवाद यात्रेत फडणवीस झाले बैलगाडीवर स्वार!
- ‘शेतकऱ्यांचे खरेखुरे तारणहार… मोदी सरकार… बाकी सगळे बोल बच्चन देणार’
- ‘शेतकऱ्यांनी फुलेंचा “असुड” उगारला तर महाराष्ट्रात भाजपाला तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही’
- मनसेचा दणका ऍमेझॉनला, शहाणपण फ्लिपकार्टला!
- ग्राम पंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ४३ हजारांची अवैध दारु जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
