Share

मनसेचा दणका ऍमेझॉनला, शहाणपण फ्लिपकार्टला!

Published On: 

मुंबई : ऍमेझॉन या शॉपिंग कंपनीच्या सेवांमध्ये मराठी भाषेच्या समावेशाच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ऍमेझॉन यांच्यात सुरु असलेला ‘नो मराठी, नो ऍमेझॉन’ वाद आता चिघळला आहे. या वादावरून ऍमेझॉन ने न्यायालयात धाव देखील घेतली आहे. दिंडोशी न्यायालयाने याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे याना नोटीस बजावली आहे.

आता मनसेने ऍमेझॉनला दणका दिला आहे. ‘ऍमेझॉनसारख्या प्रतिष्ठित कंपनीने एका चांगल्या लीगल फर्मला अपॉईंट करणं अपेक्षित होतं. पण एखाद्या मूर्ख वकिलाकडून त्यांनी ते लेटर ड्राफ्ट केलं आहे. त्यांनी जी नोटीस पाठवली आहे, त्याला काहीच अर्थ नाही. त्यांनी राज ठाकरेंना नोटीस पाठवण्याचा जो प्रकार केला आहे, त्याची किंमत नक्कीच ॲमेझॉनला येत्या काळात मोजावी लागणार आहे,’ असा इशारा काल मनसेच्या अखिल चित्रे यांनी दिला होता.

यानंतर, मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन सकाळी पुण्यातील कोंढव्यातील ऍमेझॉनचं ऑफिस मनसेने फोडलं. यानंतर, मनसेचा खळखट्याक पॅटर्न औरंगाबादमध्ये देखील दिसून आला. आता, मनसेने मुंबईतील चांदिवली येथील साकीविहार मार्गावरील ऍमेझॉन वेअर हाऊस व वसईमधील वेअर हाऊस देखील फोडलं आहे.

दुसरीकडं, ऍमेझॉनसह मनसेने फ्लिपकार्टला देखील मराठी वापरासाठी निवेदन देण्यात आलं होतं. फ्लिपकार्टला मात्र वेळीच शहाणपण आल्याचं दिसून येत आहे. मनसेसोबत संघर्ष सुरु होण्याआधीच ऍमेझॉनची मुख्यस्पर्धक कंपनी फ्लिपकार्टने मराठी स्वीकारल्याचं दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!