Share

औरंगाबाद शहरात येताय? सावधान! शहराच्या ‘या’ प्रवेशद्वारांवर होणार कोरोना चाचण्या

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहरातील कोरोना संसर्ग वाढत असल्याने महापालिकेने आता सहा एन्ट्री पॉइंटवर चोवीस तास पथके तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारपासून या पथकांमार्फत प्रवाशांची तपासणी केली जाईल. स्क्रिनिंगमध्ये ज्यांना लक्षणे दिसतील त्यांची ॲन्टीजेन चाचणी केली जाणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी गुरुवारी (दि. १८) सांगितले.

शहरात मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या विक्रमी पद्धतीने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून तर जिल्ह्यात एक हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असल्याने त्यांच्यावर उपचार करताना आरोग्य विभागाची तारांबळ उडत आहे. आत्तापर्यंत १२ कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. तरीही नव्या कोविड केअर सेंटरची गरज भासत आहे. वाढता संसर्ग कमी करण्यासाठी आता जास्तीत जास्त चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गतवर्षी बाहेरगावाहून शहरात येणाऱ्या प्रवाशांची एन्ट्री पॉइंटवर तपासणी करण्यात आली होती. त्यात हजारो जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांना नाक्यावरूनच कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे शहरात होणारा संसर्ग कमी झाला. आता पुन्हा एकदा शहराच्या एन्ट्री पॉइंटवर चाचण्या करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

शनिवारपासून या तपासण्या सुरू होतील, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले. शहरात येणारी वाहने थांबवून प्रवाशांची स्क्रिनिंग केली जाईल. त्यांना कोरोनाची लक्षणे दिसून येतील, त्यांच्या चाचण्या करून अहवाल पॉझिटिव्ह आल्यास कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जाईल. ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आले, त्यांनाच शहरात प्रवेश दिला जाईल, असे पाडळकर यांनी नमूद केले.

या ठिकाणी होणार तपासणी

चिकलठाणा येथील केंब्रीज शाळा चौक, सावंगी येथील टोल नाका, दौलताबाद टी पॉइंट, नक्षत्रवाडी, झाल्टा फाटा या ठिकाणी कोरोना चाचणीसाठी पथकांची नियुक्ती केली जाणार आहे.

हायरिस्क कंन्टेनमेंट झोनमध्येही तपासणी

कोरोना संसर्ग अधिक असलेली १९ वॉर्ड महापालिकेने रेड झोनमध्ये टाकली आहेत. याठिकाणी जास्तीत जास्त चाचण्या करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. हीच पथके लसीकरणासाठी देखील मदत करणार आहेत, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!