Share

दिलासादायक! लातूर जिल्ह्यात आठवडाभर पुरेल इतक्या लस

Published On: 

लातूर: एकीकडे कोरोना थैमान घालत आहे, तर दुसरीकडे रुग्णसंख्येत मोठ्याने भर पडत आहे. त्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना लसींचा साठा संपल्यामुळे लसीकरण केंद्र बंद असल्याच्या बातम्या धडकत असल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. पण लातूरकरांना सुखावणारी बातमी म्हणजे जिल्ह्यात अजून एक आठवडा पुरेल इतका साठा उपलब्ध असल्याची माहिती मिळत आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढू लागल्यामुळे रुग्णसंख्येचा विस्फोट होत आहे. जिल्ह्यात एकिकडे लसीकरण मोहीमही चालू आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण केंद्र बंद पडले आहेत. आज दुपारी मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधताना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील लसीचा साठा संपला होता. मात्र दुपारनंतर पाच हजार लसी उपलब्ध झाल्याचे सांगितले. पण त्यानंतर लसी उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.

मनपाकडे दररोज ६ ते ७ हजार लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यात ४५ वर्षांपुढील लसीकरणास पात्र लाभार्थी ८ लाख आहेत. पैकी आतापर्यंत १ लाख ६२ हजार नागरिकांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. पहिल्या डोसच्या संख्येनुसार आपली लसीची मागणी आहे. मात्र आज फक्त २० हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!