उस्मानाबाद: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात गेल्या महिन्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात होते, मात्र आता प्रमाण कमी होताना दिसत आहे. तालुक्यात शुक्रवारी (दि.२१) सकाळी रॅपिड अॅटिजेन चाचणीत ४० व स्वॅब अहवालात पाच असे ४५ जण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या कमी होत असली तरी देखील मृत्यू दर कमी होत नाहीये, त्यामुळे चिंता कायम आहे.
तालुका आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागात गावनिहाय सर्व्हे व तापसमीस प्राधान्य देण्यात आले. कोविड उपजिल्हा रुग्णालय, तालुका आरोग्य विभाग, खासगी रुग्णालयांमार्फत शुक्रवारी घेतलेल्या ४२८ अँटिजेन चाचणीत ४० तर स्वॅब अहवालात पाच असे एकूण ४५ पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाची दुसरी लाट राज्यातील ग्रामीण भागात सुद्धा शिरल्यामुळे कोरोनाबाधीतांच्या संख्येत कमालीची वाढ या लाटेत बघायला मिळत आहे.
मे महिन्यात २१ दिवसात ५४ च्या सरासरीने १११३ बाधित व सहाच्या सरासरीने १३९ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दहा महिन्यात ५४७४ पॉझिटिव्ह तर ५१६० जण कोरोना मुक्त झाल्याने सद्यःस्थितीत कोविड उपजिल्हा रुग्णालय, गृह विलगिकरण, मुरूम ग्रामीण रुग्णालय, शहरात खासगी कोविड सेंटर, जिल्ह्याबाहेर उपचारात ३२२ रुग्ण उपचारात आहेत. आतापर्यंत ३२४ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी शहरात ४५ पॉझिटिव्ह आलेत. शहरात २०८८ जण, ग्रामीण भागात ३३८६ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत ५१६० कोरोनामुक्त झाले. ३२४ जणांचा मृत्यू झाल्याने ३२२ उपचारात आहेत. कोविड उपजिल्हा रुग्णालय, तालुका आरोग्य विभाग, सहा खासगी रुग्णालयाच्या मार्फत घेतलेल्या १९९९२ अँटिजेन चाचणीत ३२१६ बाधित आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘प्रसंग सारखाच मात्र शिवसेना खासदारावर गुन्हा, तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना खास वागणूक ?’
- लहानग्यांना कोरोनाचा विळखा ; बालकांचे लसीकरण करून त्यांना संरक्षित करा
- ‘सूर्यवंशी’ आणि ‘बेल बॉटम’ स्वातंत्र्य दिनी प्रदर्शीत होणार ही केवळ अफवा, अक्षय कुमारने केले स्पष्ट
- सोनू सूदच्या फोटोवर दुधाचा अभिषेक ; संतापली अभिनेत्री म्हणाली…
- खिलाडी कुमारचा ‘रामसेतु’चे चित्रीकरण पुन्हा होणार सुरु; गुफांचा मोठा सेट बनवण्यात आल्याची चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

