Share

लहानग्यांना कोरोनाचा विळखा ; बालकांचे लसीकरण करून त्यांना संरक्षित करा

Published On: 

पुणे : हाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला आहे. परंतु सध्यस्थिती पाहता राज्यातील ही कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. पण अनेक तज्ञ मंडळींकडून आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात येऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्ससोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी लहान मुलांना कोरोनापासून होणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली आणि राज्य सरकार करत असलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली.

यावेळी आगामी पावसाळ्याच्या कालावधीत येणारे आजार तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये बालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संक्रमणाची शक्यता लक्षात घेता ज्या बालकांचे नियमीत लसीकरण करण्याचे राहून गेले आहे अशा बालकांच्या पालकांनी शासकीय किंवा खाजगी केंद्रावर जाऊन बालकांना लस दिली पाहिजे , ज्यामुळे त्यांना विविध आजारांपासून संरक्षण प्राप्त होईल. सर्व शासकिय व महानगरपालिका तसेच खाजगी केंद्रावर विविध आजारास प्रतिबंधक लसींची उपलब्धता आहे. त्याचा लाभ सर्व पात्र बालकांना देऊन त्यांना संरक्षित करा असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव व कोविडसाठी गठित बालरोगतज्ञांच्या टास्क फोर्सच्या वतीने करण्यात आले आहे.

सद्यस्थितीमध्ये कोविडची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे. आगामी पावसाळ्यामधील येणारे आजार तसेच कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये बालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संक्रमणाची शक्यता लक्षात घेता ज्या बालकांचे नियमीत लसिकरण करण्याचे राहून गेले आहे अशा बालकांच्या पालकांनी शासकिय किंवा खाजगी केंद्रावर जाऊन बालकांना लस दिली पाहिजे , ज्यामुळे त्यांना विविध आजारांपासून संरक्षण प्राप्त होईल. सर्व शासकिय व महानगरपालिका तसेच खाजगी केंद्रावर विविध आजारास प्रतिबंधक लसींची उपलब्धता आहे. त्याचा लाभ सर्व पात्र बालकांना देऊन त्यांना संरक्षित केले पाहिजे.

आगामी काळामध्ये चाचण्यांच्या निष्कर्षांनुसार व शासनाच्या मान्यतेनंतर व लसींच्या उपलब्धतेनुसार बालकांचेही लसिकरण करता येऊ शकेल. तिसऱ्या लाटेमध्ये बालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संक्रमणाची शक्यता लक्षात घेता ज्या बालकांचे नियमीत लसिकरण करण्याचे राहून गेले आहे अशा बालकांच्या पालकांनी शासकिय किंवा खाजगी केंद्रावर जाऊन बालकांना लस दिली पाहिजे , ज्यामुळे त्यांना विविध आजारांपासून संरक्षण प्राप्त होईल. सर्व शासकिय व महानगरपालिका तसेच खाजगी केंद्रावर विविध आजारास प्रतिबंधक लसींची उपलब्धता आहे. त्याचा लाभ सर्व पात्र बालकांना देऊन त्यांना संरक्षित केले पाहिजे. असे आवाहन कोविडसाठी गठित बालरोगतज्ञांच्या टास्क फोर्सच्या वतीने करण्यात येत आहे.

दरम्यान पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रमुख रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिल्या आहेत. पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत घेण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!