Share

खिलाडी कुमारचा ‘रामसेतु’चे चित्रीकरण पुन्हा होणार सुरु; गुफांचा मोठा सेट बनवण्यात आल्याची चर्चा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ओळख असलेला अक्षय कुमार हा त्याच्या जलद चित्रीकरणासाठी ओळखला जातो. अगदी कमी वेळेत तो चित्रपटाचे चित्रीकरण संपवण्यासाठी जाणला जातो. मागील वर्षी आक्षयने अनेक चित्रपटांची घोषणा केली होती. त्यातीलच एक चित्रपट रामसेतु या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले होते.

मात्र चित्रीकरणादरम्यान अक्षय कुमारला आणि सेटवरील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे चित्रीकरण थांबवावे लागले. मात्र अक्षय कुमारने काही दिवसापुर्वीच कोरोनावर मात केली आहे. यामुळे तो पुनरागमन करण्यास सज्ज आहे. येत्या २० जुनपासुन रामसेतुचे चित्रीकरण पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मागील एका महिन्यापासुन या चित्रपटाची टीम व्हिएफएक्सवर काम करत होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मुंबईतील फिल्मसीटीत एक मोठा सेट उभा करण्यात आला आहे. या सेट मध्ये अनेक गुंफा आहेत.

मुंबई व्यतिरीक्त इतर शहरतही या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. आगामी संप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात या चित्रपटाची संपुर्ण टीम ही श्रीलंकेत चित्रीकरणासाठी जाणार आहे. तसेच उटी मध्येही या चित्रपटाचा काही भाग प्रदर्शित होणार आहे. ‘राम सेतु’ चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक शर्मा करीत आहेत. रामसेतु या चित्रपटात आक्षय कुमार सोबत जॅकलीन फर्नाडीस आणि नुसरत भारुचा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!