Share

सोनू सूदच्या फोटोवर दुधाचा अभिषेक ; संतापली अभिनेत्री म्हणाली…

Published On: 

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक हातावर पोट असणाऱ्या लोकांवर मोठ संकट ओढावले होत. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेकांनी गरजूंना मदत करण्याचे कार्य केले.अभिनेता सोनू सूद  सध्या अनेकांसाठी देवमाणूस बनला.

यामुळे आंध्रप्रदेशातील श्रीकालहस्ती येथे चाहत्यांनी सोनू सोनूदच्या फोटोला हार घालून त्यावर दुधाचा अभिषेक केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री कविता कौशिक मात्र यावर संतापली आहे.

कविताने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, ‘आपण सगळेच सोनू सूदवर प्रेम करतो. संपूर्ण देश सोनू करत असलेल्या निस्वार्थ कामासाठी कायम त्याचा आभारी राहील. परंतु, मला या गोष्टीची खात्री आहे की, जिथे एकीकडे लोकांना खायला अन्न मिळत नाहीये आणि लोक भुकेने मरत आहेत, तिथे सोनूदेखील अशा प्रकारे दुधाची नासाडी पाहून दुखी होईल. हे मूर्खपणाचं काम आहे. यातून पुढील पिढ्या कोणताही आदर्श घेऊ शकत नाहीत,’ या मधून कविताने नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!