Share

‘सूर्यवंशी’ आणि ‘बेल बॉटम’ स्वातंत्र्य दिनी प्रदर्शीत होणार ही केवळ अफवा, अक्षय कुमारने केले स्पष्ट

Published On: 

मुंबई : बॉलीवूडमध्ये बहुतेक हे पहिल्यांदाच घडत आहे की खिलाडी कुमार म्हणजे अक्षय कुमारच्या चित्रपटाची प्रेक्षकांना वाट बघावी लागत आहे. कारण अक्षय कुमार हा त्याच्या जलद चित्रीकरणासाठी ओळखला जातो. अगदी कमी वेळेत तो चित्रपटाचे चित्रीकरण संपवण्यासाठी जाणला जातो. मात्र मागील वर्षी उद्भवलेल्या कोरोना महामारीमुळे सर्वच चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे.

मात्र यादरम्यान आक्षयने काही चित्रपाटाचे चित्रीकरण संपवल्याने त्याचे सुर्यवंशी आणि बेल बॉटम हे दोन चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. ३० एप्रिल रोजी सुर्यवंशी प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढल्याने हा चित्रपट पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला. याच पार्श्वभूमिवर बेल बॉटम आणि सुर्यवंशी हे दोन्ही चित्रपट स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्टला प्रदर्शित होतील अशी चर्चा सोशल मीडीयावर सुरु होती. मात्र आक्षयने खुद्द या चर्चेचे खंडण करत ही केवळ अफवा असल्याचे सांगितले आहे.

यावेळी बोलताना आक्षय म्हणाला की, ‘माझे आगामी चित्रपट सुर्यवंशी आणि बेल बॉटम या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता बघुन आनंद झाला. चाहत्याच्या या प्रेमासाठी त्यांचे खुप खुप आभार. मात्र मी हे स्पष्ट करु इच्छीतो की या सर्व अफवा आहेत दोन्ही चित्रपटाचे निर्माते या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल विचार करत आहे. वेळ आली की प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात येईल.’ असे सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!