Share

‘प्रसंग सारखाच मात्र शिवसेना खासदारावर गुन्हा, तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना खास वागणूक ?’

Published On: 

मुंबई : उच्च न्यायालयाने काहीच दिवसांपूर्वी राज्य सरकारला नेत्यांच्या कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या गर्दीवरून झापलं होतं, राजकीय नेत्यांचे जाहीर कार्यक्रम घेऊ नयेत अशा सूचना देखील केल्या होत्या. मात्र राजकीय नेत्यांच्या दौऱ्याला होणारी गर्दी ही कायम आहे. काल अहमदनगर मधील निळवंडे कालव्याची पाहणी करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राह्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह काही अधिकारी गेले होते.

मात्र, यावेळी कोरोना नियमांचे पालन न झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर आली आहे. निळवंडे कालव्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केलीय.

संबंधितांनी दौरा करताना कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप यावेळी लोखंडे यांनी केला आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला या पाहणी दौऱ्या डावलल्यामुळेच लोखंडे आक्रमक झाल्याच्या चर्चांना देखील उधाण आलं आहे. याबाबत लोखंडे म्हणाले, ‘डाव्या कालव्याच्या पिंपरी निर्मळ येथे बंद पडलेले काम चालू करण्यासाठी गेलो असताना परिसरातील शेतकरी जमा झाले. असं असतानाही त्यावेळी माझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, तर मग यांना वेगळा न्याय का असावा. त्यामुळे या सर्वांवर गुन्हे दाखल करून अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी.’

आता शिवसेना खासदार लोखंडे यांच्या या मागणीनंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील या दुजाभावावरून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘प्रसंग एकच पण राज्यात शिवसेना खासदारांवर गुन्हा व राष्ट्रवादी,काँग्रेसच्या नेत्याना खास वागणूक… शेतकऱ्याना भेटले तर जमावबंदी मोडल्याचा खा. सदाशिव लोखंडे यांच्यावर गुन्हा कालवा पाहणीसाठी ३ मंत्री- जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे आले. गर्दी झाली मात्र त्यांच्यावर कारवाई नाही,’ अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!