औरंगाबाद : कोरोना व लॉकडाऊनमुळे खंडित असलेल्या वेगवेगळ्या रेल्वे आता पूर्ववत धावण्यास सुरुवात झाली आहे. प्रवाशांचा वाढलेला प्रतिसाद पाहून पूर्वीच्या रेल्वे सुरु होत आहेत. कोरोनामुळे कमी प्रवासी संख्या असल्याने जालना- मुंबई जनशताब्दी विशेष एक्स्प्रेस तात्पुरती रद्द करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. आजपासून ही रेल्वे धावणार आहे.
कोरोनामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता. बऱ्याच रेल्वे त्यामुळे रद्द करण्याची वेळ आली होती. जनशताब्दी एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आली होती. आता पुन्हा जनशताब्दी एक्सप्रेस रुळावर आली आहे. (गाडी क्रमांक ०२२७२) मुंबई सी.एस.टी.एम. ते जालना जनशताब्दी विशेष एक्स्प्रेस मुंबई सी.एस.एम. टी. येथून आजपासून (दि.२५) धावणार आहे.
तर (गाडी क्रमांक ०२२७१) जालना ते मुंबई सी.एस.टी.एम. जनशताब्दी विशेष एक्स्प्रेस जालना येथून उद्यापासून (दि. २६) धावणार आहे. तसेच गाडीच्या वेळा आणि थांबे पूर्वी प्रमाणेच असतील यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. हि गाडी पूर्णतः आरक्षित असेल. गाडी मध्ये प्रवास करतांना केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने दिलेल्या कोव्हीड प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करणे प्रवाशांना बंधनकारक असणार आहे. असेही रेल्वे विभागाने स्पष्ट केले.
कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या काळात प्रवासी संख्या कमी असल्याकारणाने औरंगाबाद रेल्वे मार्गावर चालणार्या अनेक रेल्वे रद्द केल्या होत्या. औरंगाबादहून मुंबई तसेच हैदराबाद मार्गावरील जनशताब्दी, नंदीग्राम, शिर्डी विजयवाडा, काकीनाडासह औरंगाबाद रेनीगुंटा सह अन्य रेल्वे रद्द केल्या होत्या. मात्र आता हळूहळू वेगवेगळ्या रेल्वे पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त करत या निर्णयाचे स्वागत करण्यात करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- पैठणमध्ये स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट तांदूळ! प्रशासनाकडे नागरिकांच्या तक्रारी
- ‘होय, मी गुन्हा केलाय..’, सुप्रीम कोर्टातील कथित ऑक्सिजन रिपोर्टवर केजरीवालांचा खुलासा
- माधुरी दीक्षितच्या सौंदर्याने अनेकांचे वेधले लक्ष, पहा फोटो
- पिककर्जाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, परभणीत ‘रास्ता रोको’
- …अन् अचानक ‘गब्बर’ने सुरु केला भांगडा ; पहा भन्नाट व्हिडीओ


