Share

धक्कादायक! सुनेच्या जाचास कंटाळून सासऱ्याची आत्महत्या!

Published On: 

बीड: आता पर्यंत आपण सासरच्या जाचाला कंटाळून सुनेने आत्महत्या केली असं अनेक वेळा ऐकलं आहे मात्र याच्या उलट घटना अंबाजोगाई तालुक्यात घडली आहे. सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तालुक्यातील डोंगरपिंपळा येथे धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी सासूच्या फिर्यादीवरुन सुनेसह तिच्या माहेरच्या तीन जणांवर ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जमिनीच्या वादातून घरात सतत किरकिर होत होती तसेच हा वाद इतका शिंगेला गेला की शेवटी सासऱ्याने आत्महात्या केली, शिवाजी बळीराम केंद्रे (६५, रा. डोंगरपिंपळा) असे मयताचे नाव आहे. शिवाजी यांची सून पूनम प्रकाश केंद्रे ही कौटुंबीक कारणावरुन सतत सासू-सासऱ्याशी वाद घालत असे. जमिनीची वाटणी करण्यावरुन तसेच संपत्तीवरुन ती सासरे शिवाजी यांना त्रास देत असे. माहेरच्या मंडळींचीही तिला साथ असे. सततच्या जाचास कंटाळून डोंगरपिंपळा येथील महादेव केंद्रे यांच्या शेतातील आखाड्यावरील पत्र्याच्या आडूला दोरीने गळफास घेऊन शिवाजी यांनी आत्महत्या केली.

असा प्रकार घडल्या नंतर याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता घरगुती वाद चव्हाट्यावर आला, याप्रकरणी कुसूम शिवाजी केंद्रे यांच्या फिर्यादीवरुन सून पूनम प्रकाश केंद्रे (रा.डोंगरपिंपळा), श्रीहरी दादाराव चाटे, आशाबाई श्रीहरी चाटे, महेश श्रीहरी चाटे, अविनाश श्रीहरी चाटे (सर्व रा. साकूड) यांच्यावर ग्रामीण ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.तसेच या प्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक श्रीनिवास सावंत करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!