Share

दिलासादायक : कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटवर DRDO चे औषध प्रभावी

Published On: 

मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होती. आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत असल्याचे मागील काही दिवसांपूर्वी आपल्याला पाहायला मिळाले होते. दरम्यान आज देशातील कोरोना प्रादुर्भावाची सविस्तर माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली.

यावेळी कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिअंटबाबत नागरिकांनी जागरुक राहण्याची गरज असल्याचं सांगण्यात आले आहे. दरम्यान आता कोरोनावर उपचारांसाठी विकसीत करण्यात आलेलं 2-DG औषध कोरोना विषाणूच्या सर्व व्हेरिअंटवर प्रभावी ठरत असल्याचा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे. 2-DG असं या औषधाचं नाव आहे. DRDO च्या इंन्स्टिट्युट ऑफ न्यूक्लिअर मेडिसीन एंड अलाईड सायन्सेसने तयार केलेलं हे औषध पूर्णत: भारतीय बनावटीचं आहे.

2-DG औषध कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटच्या संक्रमणाला रोखू शकतं असा दावा करण्यात आला असून या औषधामुळे विषाणूचं मल्टीप्लिकेशन देखील कमी होतं, असंही नमूद करण्यात आलं आहे. देशात सध्या कोरोना उपचारांसाठी 2-DG औषधाला मान्यता देण्यात आलेली आहे. 2-DG हे औषध सुरुवातीला कोरोनाच्या दोन व्हेअरिंटवर म्हणजेच B.6 आणि B.1.1.7 वर वापर करुन पाहण्यात आलं. पण यात अँटी-व्हायरल गुण असल्यानं हे औषध कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटवर प्रभावी ठरत असल्याचं निदर्शनास आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!