औरंगाबाद : पर्यटकांना पर्यटनांचा आनंद घेता यावा, अनेक रोजगारांना मदत व्हावी, या उद्देशाने सर्व पर्यटन स्थळे सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे पर्यटन उद्योगातील व्यावसायिक, खेळणी विक्रेते, फूड स्टॉल विक्रेते, गाईड आदींनी आरटीपीसीआर चाचणी सात दिवसांत करणे बंधनकारक आहे. असे निर्देश औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. जर या व्यक्तींनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले असतील; कोणतीही कोरोना आजारांची लक्षणे नसतील, अशांनी आरटीपीसीआर चाचणी करण्याची आवश्कता नाही. मात्र, त्यांनी लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक असल्याचेही चव्हाण म्हणाले.
पर्यटन स्थळे सुरू करण्यात आली असली तरी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. पर्यटन स्थळांबाबतच्या आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटनांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधित आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग कायदा १८९७ अन्वये दंडनीय, कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेली पर्यटन स्थळे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मात्र, त्यासाठी आधी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रमुखाचे आदेश अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार औरंगाबाद मधील सर्व पर्यटन स्थळे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेसची असेल तर शिवसेनेचीही स्वबळाची तयारी’, मंत्री अब्दूल सत्तार यांचा निर्धार
- नियमावलीवरून मोदी सरकारशी पंगा घेणाऱ्या ट्विटरविरोधात पहिला गुन्हा युपीत दाखल
- ‘खोटारड्यांच्या जागतिक स्पर्धेत मोदींना दरवेळी सुवर्णपदक मिळेल’, काँग्रेसचा हल्लाबोल
- ‘बाबरप्रेमी पप्पू व पप्पूच्या मम्मीला खूश करण्यासाठी मंदिर उभारणीची बदनामी’
- ‘मोदी सरकारने मर्जीनेच दोन लसींच्या डोसमधील अंतर वाढवले’, राहुल गांधींचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
