Share

कोरोना काळात स्टील कंपनीला ऑक्सिजन देणाऱ्या दोघांचा जामीन अर्ज फेटाळला

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना महामारी सुरु असतांना देखील वैद्यकिय ऑक्सीजनची कंपनीला विक्री केल्याप्रकरणी झैनाब इंटरप्राईजेच्या मालक शेख अजिज सलीम (वय ३६) आणि अब्दुल हकीम अब्दुल सलीम (वय ३३, दोघे रा. लक्ष्मण चावडी, जुना मोंढा औरंगाबाद) या दोघांनी सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एस. देशपांडे यांनी फेटाळला.

प्रकरणात बिडकीन पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक प्रशांत मुंडे (वय ३१) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, २२ मे रोजी दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे सहाकरी हद्दीत गस्त घालत असतांना त्यांना माहिती मिळाली की, कोवीड या संसर्गजन्य आजाराच्या साथीमध्ये रुग्णांना उपचारासाठी दिले जाणारे ऑक्सीजन हे झैनाब इंटरप्राईजेस या ऑक्सीजन वितरक कंपनीचे वाहन क्रमांक (एमएच-२०-सीटी-११३९) जालना एमआयडीसी येथील आर.एल स्टिल कंपनीत जात असल्याची माहिती मिळाली होती.

बिडकीन पोलिसांनी या वाहनांचा पाठलाग सुरू केला तेंव्हा हे वाहन औरंगाबादच्या जुना मोंढा भागातील झैनाबच्या गोडावून मध्ये गेले होते, तेथून अध्र्या तासानंतर दुसरे वाहन क्रमांक (एमएच-२०-सीटी-९६६३) ऑक्सीजनने भरलेले सिलेंडर घेवून जालना रोडने जात होते. पोलिसांनी पाठलाग करून हे वाहन देमनी शिवारात पकडले. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता लाल रंगाच्या ताडपत्रीखाली दडविलेले ऑक्सिजनने भरलेले सिलेंडर मिळून आले होते. याप्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!