बीड : बीड जिल्ह्यातील खासगी शाळांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीसची सक्ती करू नये व फीस न भरल्याचे कारण देत कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण बंद करू नये, विद्यार्थी, पालकांना अपमानास्पद वागणूक देऊ नये, अशी ताकीद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी सर्व शाळांना दिली. कुंभार यांनी याबाबत सर्व शाळांना पत्र दिले आहे.
शिक्षण हक्क कायदा आणि मोफत शिक्षणाचा अधिकार हा सर्व बालकांना आहे. सन २०२० पासून कोरोना महामारीमुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या असून ऑनलाइन प्रणालीद्वारे सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण देणे सुरू आहे. मात्र, अनेक शाळांनी आता पालकांकडे फीससाठी तगादा लावला असून विद्यार्थ्यांचे शिक्षणही बंद केल्याचे प्रकार आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे पालक व शिक्षणप्रेमींनी तक्रारी केल्या होत्या.
यावर आता सीईओ कुंभार यांनी सर्व शाळांना पत्र काढले असून पालकांची आर्थिक स्थिती बेताची आहे, कोरोनामुळे अनेक पालकांचे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले आहेत, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अशा स्थितीत शाळांनी संवेदनशीलता दाखवून फीससाठी विद्यार्थ्यांना सक्ती करू नये, त्यांचे शिक्षण थांबवू नये, इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत फीस न भरलेल्या विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक देऊ नये, असे आवाहन केले आहे. ज्या शाळा अशा प्रकारे सक्ती करतील आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाने मृत झालेल्या आशा स्वयंसेविकेच्या वारसदारांना ५० लाखांचा विमा प्राप्त
- बीडच्या शिवसेनेत जिल्हाप्रमुखांचा बदल, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी
- पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते पंधरा रुग्णवाहिकांचे लोकार्पण
- ‘आप से बेहतर उम्मीद किये थे हम’, मिम्स शेअर करत सेहवागने व्यक्त केली नाराजी
- मायकेल वॉनने पुन्हा उडविली भारतीय चाहत्यांची खिल्ली ; म्हणाला, मला माफी मागावी लागेल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
